Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 04:24 PM
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! (Photo Credit- X)

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका!
  • राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव (Dharahiv) जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुजार यांच्या कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या. यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड, तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे. डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पांचा ‘काळा’ कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर ‘खंडणी’चे गुन्हे; कंपन्यांचा मनमानी कारभार उघड

जीवनरेखा प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे. तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे पेपरलेस कार्यालय संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे.

या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर प्रशासनात वाढवून कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी पुजार यांनी केले.

Dharashiv Health Department: धाराशिव आरोग्य विभागात गैरप्रकार? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा आ. हेमंत ओगलेंनी केला आरोप

Web Title: Dharashiv district ranks third in the state in e governance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Dharashiv
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
1

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही
2

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
3

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
4

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.