Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात खताच्या नावाखाली लालसर मातीची विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 03:40 PM
खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक!
  • 400 ते 500 पोती संशयित खत जप्त
  • कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
धाराशिव : खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना चक्क लालसर मातीची विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी विभाग, खत विक्रेते आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकरी संघटनेला काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातीलअणदूर परिसरात बोगस रासायनिक खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित कृषी सेवा केंद्रातून खताची पोती खरेदी करून त्याची पडताळणी केली. खताच्या पोत्यांवर 20:20:0:13, 15:15:10, 18:46 यांसारख्या रासायनिक खतांचे उल्लेख असतानाही प्रत्यक्षात पोत्यांमध्ये खताऐवजी लालसर माती असल्याचा संशय निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील शेतकरी ऍग्रो कार्पोरेशन कंपनीचे शेतकरी राजा नावाचे हे खत असल्याचे समोर आले आहे.

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

ट्रकमधील खत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

या प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संशयित खताने भरलेला ट्रक थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही पोती उघडून पाहण्यात आली असता त्यामध्ये खताऐवजी माती असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित कंपनी व विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

पाच वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार नवीन नसून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माथी बनावट खत मारले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून विविध रासायनिक खतांच्या नावाखाली माती भरून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय जमिनीची सुपीकता आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर प्रकार

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत बनावट खतांचा हा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

शेतकरी संघटनांनी संबंधित कंपनी, विक्रेते आणि या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून बनावट बियाणे, खत आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खताच्या नावाखाली माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. या रॅकेटमागील सूत्रधारांना अटक करून त्यांची संपूर्ण साखळी उघड करावी,” अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठांच्या विक्री व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कृषी विभागाच्या देखरेख आणि तपासणी यंत्रणेचीही कसोटी लागणार आहे.

Dharashiv News: बेंबळीत वाढदिवसाचा आनंद क्षणात मातीमोल! ५० वर्षीय महिलेला विषबाधा अन्…

Web Title: Dharashiv fake fertilizer racket red soil sold as chemical fertilizer farmers alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.