Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

कर्जमाफी योजनेपासून अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने ग्राहक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संबंधित सहकारी सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याला तातडीने बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले, मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चापोटी 20 हजार रुपयांची भरपाई देण्याचेही निर्देश आयोगाने दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 04:16 PM
अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

Follow Us
Follow Us:
  • कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
  • बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश
  • मानसिक त्रास व खर्चापोटी २० हजारांची भरपाई
धाराशिव : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र असूनही प्रशासकीय हलगर्जीपणामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्याय दिला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी, वाघोली (वरूडा) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धाराशिव यांच्या निष्काळजीपणावर आयोगाने ताशेरे ओढत शेतकऱ्याच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

पवारवाडी (ता. धाराशिव) येथील पांडुरंग रामलिंग मुंढे आणि शालूबाई पांडुरंग मुंढे यांनी ३ एप्रिल २०१४ रोजी ऊस पिकासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून पीककर्ज घेतले होते. त्यानंतर राज्य शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू केली. त्यानुसार मुंढे दाम्पत्याने २४ ऑगस्ट २०१७ रोजी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्जही सादर केला.

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

मात्र, सर्व निकष पूर्ण करूनही संबंधित सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुकीमुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याबाबत त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनीही संबंधित संस्थांना नियमानुसार कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत पत्रव्यवहार केला; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.

अखेर ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांच्या माध्यमातून मुंढे दाम्पत्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, धाराशिव येथे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करत अर्जदारांनी संबंधित संस्थांच्या निष्काळजीपणामुळे आपण कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे आयोगासमोर सिद्ध केले. पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत ३० जून रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रार मंजूर केली. आयोगाने विविध कार्यकारी सेवा सोसायटी, वाघोली (वरूडा) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबंधित पीककर्जाबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

याशिवाय, अर्जदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये, अशी एकूण २० हजार रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी अर्जदारांची बाजू मांडली. त्यांना ॲड. प्रतिक्षा सारूक-सोनवणे आणि ॲड. सचिन डी. कांबळे यांनी सहकार्य केले.

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र असूनही प्रशासकीय चुका, निष्काळजीपणा किंवा विलंबामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित संस्था जबाबदार धरल्या जाऊ शकतात, असा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे.

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

Web Title: Farmer gets justice consumer commission orders society and district central bank over loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
1

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.