Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update : धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद

धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि प्रारंभीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून ८ जूनपर्यंत अपेक्षित ३३.८ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट म्हणजेच १९६.४ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 12:37 PM
धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद

धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी
  • सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस
  • ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद
Dharashiv Weather News Marathi : धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि प्रारंभीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून ८ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३३.८ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९६.४ टक्के पर्जन्यमान झाले असून सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार कळंब तालुका सर्वाधिक १२१.९ मिमी पावसासह अव्वल ठरला आहे. या तालुक्यात सरासरीच्या ३४२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भूम तालुक्यात ८५.४ मिमी (२४४ टक्के), परंडा तालुक्यात ७९.५ मिमी (२६५ टक्के), वाशी तालुक्यात ७९.० मिमी (२३६ टक्के), उमरगा तालुक्यात ६३.४ मिमी (२१४ टक्के) आणि धाराशिव तालुक्यात ४२.९ मिमी (१२१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर तुळजापूर तालुक्यात ३७.४ मिमी (११८ टक्के) आणि लोहारा तालुक्यात २१.५ मिमी (७४ टक्के) पाऊस झाला आहे.

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन

कळंब तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश स्थिती दिसून आली. मोहा मंडळात १६७ मिमी, गोविंदपूरमध्ये १६३ मिमी आणि कळंब मंडळात १४६.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. यामुळे या भागातील ओढे-नाले वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंडा तालुक्यातील परंडा मंडळात १३२.५ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४४१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळात १००.४ मिमी, आंबीमध्ये ८१ मिमी, तसेच भूम मंडळात ८२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातील मुळज मंडळात ११२.६ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ३८१ टक्के आहे. वाशी तालुक्यातील पारगाव मंडळात ८५.६ मिमी, तर तेरखेडा मंडळात ७८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे काही मंडळांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. केशेगाव, नळदुर्ग आणि अनाळा मंडळांमध्ये पावसाची नोंद शून्य राहिली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात ८ जूनपर्यंत सरासरी ३५.७ मिमी पावसाच्या तुलनेत ३०.४ मिमी पाऊस झाला असून विभागीय पातळीवर पर्जन्यमान ८५.२ टक्के आहे. मात्र धाराशिव जिल्ह्याने विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लक्षणीय आघाडी घेत सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस नोंदविला आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या दमदार पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dharashiv News : ‘साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम’; नवोदित साहित्य संमेलनात कैलास घाडगे पाटील यांचे प्रतिपाद

Web Title: Dharashiv record rainfall double than average before monsoon june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
2

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी
3

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार
4

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.