Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Reopening : शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती

१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे. विशेषतः लहान मुलांना उष्माघात आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका असल्याने चिंता वाढ

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 02:33 PM
शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती

शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती

Follow Us
Follow Us:
  • १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश
  • शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
  • उष्णतेमुळे पालक चिंतेत
  • आरोग्याला धोका होण्याची भीती
कारंजा-घाडगे/वर्धा : महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विदर्भातील तीव उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गत अनेक वर्षांपासून विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होत होत्या. परिसरातील हवामानाचा विचार करून न्यायालयानेही यापूर्वी २६ जूनपासून शाळा सुरू करण्यास समर्थन दिले होते. यंदा मात्र राज्यभर एकसमान दिनांक निश्चित करत शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भात यंदा तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून जून महिन्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या अनेक भागात दुपारचे तापमान ४० अंशांच्या वर कायम आहे.

जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका; १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडणार?

अशा परिस्थितीत सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळा भरविल्यास विद्याथ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून सायकलने किंवा पायी शाळेत जातात. काही ठिकाणी बससेवाही नियमित नाही. त्यातच अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची स्थिती आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून जलपुरवठाही अनियमित असल्याने विद्यायांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. भीषण उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्याची अपेक्षा

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. भीषण उष्णतेमुळे विद्याथ्यर्थ्यांना होणाऱ्या संभाव्य त्रासापासून संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२६ जूनपासून शाळा सुरू करण्याची मागणी

शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यापूर्वी विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने पालक संभ्रमात आहेत. विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनीही शासनाकडे निवेदने देत विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू करण्याची मागणी केली आहे.

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

Web Title: School reopening june 15 heatwave parents concern maharashtra news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • heatwave
  • maharashtra
  • Student

संबंधित बातम्या

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
1

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार
2

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
3

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी
4

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.