Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Dharashiv News: सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्तांच्या कक्षाच्या नूतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा काम हाती घेतल्याचे समोर आले आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 19, 2026 | 03:10 PM
जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

शीतलकुमार शिंदे | धाराशिव: धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्तांच्या कक्षाच्या नूतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा काम हाती घेतल्याचे समोर आले आहे. जनहिताच्या कामांसाठी असलेला निधी अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मागील आर्थिक वर्षात तत्कालीन समाजकल्याण उपायुक्तांनी त्यांच्या कक्षाचे नूतनीकरण करून घेतले होते. त्या वेळी फर्निचर, रंगरंगोटी आणि इतर सुविधा यावरही मोठा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांतच अधिकाऱ्यांची बदली झाली आणि नवीन उपायुक्तांनी पदभार स्वीकारला. मात्र, आधीच सुसज्ज आणि चांगल्या स्थितीत असलेल्या कक्षाचे पुन्हा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये नवीन फर्निचर, दुरुस्ती, रंगकाम यासाठी पुन्हा लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून उपलब्ध करून दिलेले दर्जेदार फर्निचर आणि सुविधा अद्याप वापरण्यायोग्य आणि उत्तम अवस्थेत असतानाही हा खर्च केला जात असल्याने ‘दुबार खर्च’ होत असल्याची चर्चा आहे. डीपीसी निधी हा जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य यांसारख्या जनहिताच्या कामांसाठी वापरणे अपेक्षित असताना, त्याचा वापर अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या सजावटीसाठी होत असल्याने सामाजिक न्यायाच्या तत्वालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना अशा प्रकारचा खर्च नागरिकांना संतापजनक वाटत आहे.

Maharashtra Rain Alert: सणाच्या दिवशी पण पाऊस! पुणे शहरात वरूणराजाने लावली हजेरी

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधित विभागाची चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश मोरे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडून माहिती घेण्याचे सांगितले. संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी या कामासाठी डीपीसी निधी वापरला जात असल्याचे मान्य केले, मात्र हे काम दुबार नसल्याचा दावा केला. तसेच या कामाची संपूर्ण संचिका पाहण्यासाठी सोमवारी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह

जिल्हा नियोजन समितीचा निधी हा लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनुसार जनतेच्या मूलभूत गरजांसाठी खर्च होणे अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या कक्षावर वारंवार खर्च केल्यास निधीचा उद्देशच हरवतो, अशी भावना व्यक्त होत आहे.

रंगरंगोटीही दुबारच?

सामाजिक न्याय भवनातील सभागृह, मुख्य इमारत आणि कंपाउंड वॉल यांना मागील वर्षीच रंगरंगोटी करण्यात आली होती. तरीदेखील यावर्षी पुन्हा त्याच कामांची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते. या कामांमधून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांचा रोष वाढला

या प्रकारामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास कमी होत असून, करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जुनी वाहनं वापरणं आता महाग होणार; वाहनांवर दुपटीने केली गेली करवाढ

Web Title: Strike against social justice from the dpc fund in public interest demand for a high level inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Government
  • maharashtra

संबंधित बातम्या

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
1

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर? नागरिकांचा संताप वाढला
2

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर? नागरिकांचा संताप वाढला

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
3

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
4

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.