Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Protest: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

Congress Protest: काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील विद्यार्थी व युवक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेस खासदारांना अटक करण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 23, 2026 | 01:18 PM
Karad Congress, NEET Protest, Satara Congress, NEET Paper Leak Satara News,

Karad Congress, NEET Protest, Satara Congress, NEET Paper Leak Satara News,

Follow Us
Follow Us:

Congress Protest:  नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गैरप्रकाराच्या निषेधार्थ, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने शिवतीर्थ दत्त चौक येथे गुरुवारी भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे दत्त चौक परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.

‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, ‘मोदी सरकारचा निषेध असो’, ‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला

यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील विद्यार्थी व युवक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेस खासदारांना अटक करण्यात आली. ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असून केंद्र सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार म्हणाले, नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. युवकांच्या प्रश्नांसाठी युवक काँग्रेस आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस

या आंदोलनात पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, मुबीन बागवान, उमर सय्यद यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस व एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

आमचे भविष्य सुरक्षित करा..!

आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने ‘आमचे भविष्य सुरक्षित करा’, असा फलक हातात घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांच्या मनातील असुरक्षितता आणि संताप अधोरेखित केला.

 

 

Web Title: Dharmendra pradhan resignation demand karad city congress agitation namdevrao patil statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Congress
  • Karad
  • neet paper leak

संबंधित बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
1

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
2

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
3

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
4

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.