Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित; सिंचन विभागाचे आश्वासन

धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सिंचन विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 06, 2026 | 06:49 PM
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित; सिंचन विभागाचे आश्वासन

धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित; सिंचन विभागाचे आश्वासन

Follow Us
Follow Us:
  • धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित
  • सिंचन विभागाचे आश्वासन
  • लेखी आश्वासनानंतर समितीचा निर्णय
वाई-जावली-सातारा-कोरेगाव, प्रतिनिधी : धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने ६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेले उपोषण आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. सातारा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर समितीने हा निर्णय घेतला. समितीने यापूर्वी उन्हाळी हंगामातील पाणी सोडण्याबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ५ एप्रिल रोजी नियोजित सिंचन आवर्तन न सोडल्यास ६ एप्रिल रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता.

Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी

दरम्यान, सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी दिलेल्या पत्रानुसार, धोम उजवा व डावा कालव्याचे नियोजन करण्यात आले असून उन्हाळी हंगामासाठी पाणी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, कालव्याचे आवर्तन नियमानुसार टप्प्याटप्प्याने सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भागातील तिसरे सिंचन आवर्तन २९ मार्च २०२६ रोजी बंद करण्यात आले असून, त्यानंतर उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन ६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार पाणी कोट्यानुसार देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार २ ते ३ सिंचन आवर्तने देण्याचे नियोजन आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत नियोजित उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील काळातही पाणी व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहू नये, अन्यथा पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित सिंचन अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.

धोम धरण पाणी बचाव आंदोलनाचे मुख्य मुद्दे

नियमबाह्य पाणी वाटपाचा विरोध: जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी धरणातून पाणी सोडल्यास उपोषण आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देते.

हक्काचे पाणी: लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणे हा मुख्य उद्देश आहे.

कालवा दुरुस्ती: धोमच्या डाव्या व उजव्या कालव्याची सफाई आणि दुरुस्ती (अस्तरीकरण) करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

आंदोलन व जलपूजन: मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आणि जलपूजनाद्वारे जनजागृती केली जात आहे.

पाणी चोरी: कालव्याचे कुलूप तोडून पाणी चोरीचे प्रकार घडल्याने, दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.

गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात

Web Title: Dhom dam water conservation protest postponed after irrigation department assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Farmers Protest
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.