Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon: शिवशाही पुन्हा जळाली! चालकाच्या सतर्कतेमुळे बचावले ‘इतके’ प्रवासी

Jalgaon: धुळे शहरातील शिवशाही बसला पुन्हा एकदा आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ४९ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 23, 2026 | 11:17 AM
Shivshahi Bus Fire (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shivshahi Bus Fire (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धावत्या शिवशाही बसला धुळ्याजवळ भीषण आग
  • ४९ प्रवाशांचे चालक वाहकाव्या सतर्कतेमुळे प्राण वाचले
  • काही मिनिटांत बस जळून खाक
  • प्राथमिक अंदाज शॉर्टसर्किट
  • यापूर्वीही शिवशाही बसांना आग लागण्याच्या घटना
Shivshahi Bus Fire: शिवशाही बसेसला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतानाही एसटी महामंडळाने धडा घेतला आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला मंगळवारी दुपारी धुळे शहरालगतच्या नगावबारी परिसरात भीषण आग लागली. काही क्षणांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे ४९ प्रवाशांचे प्राण वाचले, अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती. (Jalgaon)

बस तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी

एमएच ०६ बीडब्ल्यू-०४७१ क्रमांकाची शिवशाही बस धुळ्याकडे येत असताना इंजिनातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचे आगीत रूपांतर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालक राहुल रमेश चव्हाण यांनी बस तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहक साजिद महमंद यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. प्रवासी बाहेर पडताच काही मिनिटांत संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. या दुर्घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. चालक आणि वाहक यांनी कर्तव्यदक्षता दाखवली; मात्र वारंवार जळणाऱ्या शिवशाही बसांमुळे एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला सुरुवात; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची निवड

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी अंतिम कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पालघरमध्ये साकारणार भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ; अरबी समुद्रात उभे राहणार ४५ हजार कोटींचे महाप्रकल्प

प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार?

या घटनेने पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यापूर्वीही शिवशाही बसांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही तांत्रिक तपासणी, फिटनेस ऑडिट आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत ठोस बदल का होत नाहीत ? प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबणार कधी, असा सवाल आता प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.

Web Title: Dhule shivshahi bus catches fire again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Bus Accident
  • Bus Fire
  • Jalgaon
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

मुंबई-पुणे मार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग
2

मुंबई-पुणे मार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
4

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.