मुंबई : हाफकीन संस्थेबाबतच्या (Haffkine Institute) विधानावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे वृत्त सोशल मीडियावर (News Viral On Social Media) व्हायरल झाले होते. त्यावर सावंत यांनी चांगलेच झापले. हाफकीन माणसाकडून औषधे घेणे बंद करा, असे सावंत म्हणाल्याचे व्हायरल झाले. त्यावरुन त्यांनी संताप (Angry) व्यक्त केला.
तुम्ही अशा चुकीच्या बातम्या (Fake News) चालवणार असाल तर आपण संवाद बंद करूया. मी पीएचडी (Ph.D) आहे, हाफकीन माणूस हयात नाही, एवढे मला कळत नाही का, असे तानाजी सावंत म्हणाले. विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, हे तुम्ही म्हणताय. तुम्हाला माध्यमांना हे सरकार आलेले रुचत नाहीय. माझे शिक्षण तुम्हाला माहित आहे ना. मी सोलापूरमध्ये मेरिटमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी पीएचडी केली आहे. हाफकीन नावाच्या माणसाकडून औषधे घेणे बंद करा, एवढा मूर्खपणा मी करेन का? असे सावंत म्हणाले.
तसेच, औषधाचे क्षेत्र डिसेंट्रलाईझ केले पाहिजे, हे मार्गदर्शन मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले. आता हाफकीन माणसाचे काढून घ्या, असे मी म्हणेन का, एवढा मूर्ख आहे का मी? मी किती संस्था, कारखाने चालवतो हे सगळे पहा. अनेक पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी काय अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? असा संताप सावंत यांनी व्यक्त केला.






