नवभारत-नवराष्ट्र एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्डचे मुंबईत मोठ्या दिमाखात वितरण
देशातील विविध राज्यांची रचना पाहता काही ठिकाणी राजकीय भूमिका वेगळ्या असतील. मतभेद असतीलही पण देश सशक्त व्हावा, तरुणांमध्ये कौशल्य विकसित व्हावीत हे नव्या शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दीष्ट आहे. देशाचा विकास व विद्यार्थ्यांचा विकास हे ध्येय असल्यामुळे संपूर्ण देश या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे येईल. सर्वच राज्य नवे शैक्षणिक धोरण स्वीकारतील, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सशक्त होतो आहे. देशाच्या वाटचालीत आपल्या सगळ्यांचा सहभाग गरजेचा आहे. भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. आपल्या देशाचे सरासरी वय २७ वर्षे आहे. या सर्वाधिक तरुण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कौशल्यांचा विकास करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी व्यक्त केले.
नवभारत – नवराष्ट्र एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड -२०२४ चे वितरण पंचतारांकित हॉटेल ऑर्कीडमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या संस्थांचे संचालक, अधिकारी, शिक्षक – प्राध्यापकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. नवे शैक्षणिक धोरण देशाला सशक्त करण्यास मदत करेल. भारताच्या तरुण लोकसंख्येमुळे येत्या काळात आपण जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. आपण जगातील पहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, ही अपेक्षा सत्यात उतरवायची असेल तर तरुणांमध्ये कौशल्य विकसित करावे लागतील, असेही ते म्हणाले.
गेल्या तीन-साडेतीन दशकांपासून शैक्षणिक धोरणात बदलांची प्रतीक्षा होती. केंद्र सरकारने त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांची मते घेत, त्यांच्याकडून माहिती घेत नवे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आखले आहे. या धोरणामुळे आता आवडीच्या क्षेत्रात ज्ञानार्जनाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मुलभूत बदल शक्य आहे, असे मत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले. नवभारत – नवराष्ट्र एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड – २०२४ चे वितरण आज पंचतारांकित हॉटेल ऑर्कीडमध्ये करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या संस्थांचे संचालक, अधिकारी, शिक्षक – प्राध्यापकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
पूर्वी विद्यार्थ्यांना एखाद्या विद्याशाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्यातच करिअर करावे लागत होते. एखाद्या बोगद्यात शिरल्यानंतर परतीचा मार्ग नसावा, अशा प्रकारचे शिक्षण होते. मात्र आता तसे राहिलेले नाही. जगात ज्या शिक्षणाची मागणी आहे, कौशल्यांची मागणी आहे, तेच शिक्षण व कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक होते. ते आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होईल. युवकांना जागतिक संधी मिळाव्यात यासाठी शिक्षण मिळेल, असेही आमदार शेलार म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवे शैक्षणिक धोरण व आव्हाने या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात आयआयएमच्या संचालक डॉ. देवस्कर, इस्रो केंद्राचे डॉ. शालीग्राम, शास्त्री ग्रुपचे अध्यक्ष डॉ. शर्मा आदी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांचा गौरव करण्यात आला. तर नवे शैक्षणिक धोरण व आव्हाने या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी नवभारतचे कार्यक्रम हे समाजाला नवी दिशा, ऊर्जा देणारे असतात. लोकप्रतिनिधी म्हणून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे, असे गौरवोद्गार राहुल नार्वेकर यांनी काढले. येथे झालेला विविध शिक्षण संस्थांचा गौरव हा केवळ त्या संस्थांचा नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणार्या संस्थांचा हा प्रातिनिधिक गौरव आहे, असेही ते म्हणाले.
परदेशात विधिज्ञ म्हणून काम करत असताना प्रभावी व्यक्तीची निवड केली जाते. समाजाची बाजू मांडणारे विधिज्ञ चांगले असायला हवेत, तरच प्रभावी समाजाची निर्मिती होईल, असे सांगतानाच आमदार शेलार म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण लागू करणे, त्याची अंमलबजावणी करणे हे आपले काम आहे, असे न मानता नवे धोरण लागू करण्यात आले.
डॉ. विलास नितनवरे-प्राचार्य आणि डॉ. अभिषेक रे (उपप्राचार्य, के सी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि रिसर्च-एक्सलन्स इन इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट एज्युकेशन विथ कॅपॅसिटी बिल्डिंगवर विशेष प्रोत्साहन)
डॉ. बिपिन सुळे-सीईओ, विश्व कर्मा संस्था आणि विद्यापीठ-व्यावसायिक शिक्षणातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व.
डॉ. सुनील कहर्डीकर-संचालक, खर्डीकर क्लासेस-बेस्ट डिस्टन्स लर्निंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर
डॉ. विक्रम कामत-सीएमडी, खास विट्स कामत्स ग्रुप-बेस्ट हॉस्पिटॅलिटी व्होकेशनल ट्रेनिंग अकादमी (कामट्स हॉस्पिटॅलिटी अकादमी ऑफ स्किल्स)
डॉ. लवेंद्र सुरजमलजी बोथरा-कॅम्पस संचालक आणि प्राचार्य, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट, अलमुरी रत्नमाला इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी-इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर इन मुंबई महानगर प्रदेश.
डॉ. नीलेश नरेश पाटील-संस्थापक, निलेश पाटील शेअर मार्केट
लक्ष्मीकांत उपाध्याय-व्यवस्थापकीय विश्वस्त, आदर्श महाविद्यालय आणि शाळा, कल्याण-सर्वाधिक नामांकित शिक्षण संस्था
गजेंद्रजी आर.बियाणी-कुलगुरू, बियाणी इंटरनॅशनल स्कूल-हिंगोली-ई-टेक्नो आणि डिजिटल स्कूल हिंगोली
राहुल आनंदराव चौहान-सामग्री प्रमुख (प्रवीण त्यागी-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने), PACE IIT आणि वैद्यकीय-क्रांतिकारक शिक्षक पुरस्कार.
शैलेश जोशी-डीजीएम, पंजाब नॅशनल बँक- शैक्षणिक कर्जातील सर्वोत्तम बँकर
प्रिती भार्गव, यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अजय कौल-प्राचार्य, बाल कल्याण केंद्र-शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व
प्रकाश सी. गुरनानी-सीईओ, नवीन शिक्षण उल्हासनगरमधील शाळा आणि महाविद्यालय
सुधांशू राणे-एमडी, मूव्हिंग डिजिट्स प्रायव्हेट लिमिटेड-बेस्ट स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट
डॉ. उषा मुकुंदन-संचालक, हिंदी विद्या प्रचार समिती-गेल्या 75 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा-एमएमआर क्षेत्र