फोटो सौजन्य - Social Media
सौंदर्याची व्याख्या बदलून टाकणारी ही व्हिडीओ सोशल मीडियावर फार Viral होत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक Video Viral होतात त्यातील काही गंभीर तर काही हसवणाऱ्या असतात. नेटकऱ्यांना Funny व्हिडीओ पाहण्याचा एक वेगळाच छंद असतो आणि अशा नेटकऱ्यांसाठी ही व्हिडीओ म्हणजे सोन्यावर सुहागा! कारण ही व्हिडीओ एकदा पाहिलात तर पुन्हा-पुन्हा पाहाल कारण त्यामध्ये मज्जाच काही ओर आहे.
ही व्हिडीओ सोशल मीडियावर @zingat_sarpanch या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये दोन मुलं एलिव्हेटरमध्ये असतात. तेव्हा अचानक एक पाय बंद होणाऱ्या एलिव्हेटरच्या दरवाजाला बंद होण्यापासून वाचविण्याकरिता एलिव्हेटरच्या आत येतो. त्या पायात मॉडर्न बूट असतात. पाहून असं वाटेल की ते पाय कोणत्या तरी सुंदर आणि तरुण महिलेचे आहे. त्यामुळे ते एलिव्हेटरमध्ये बंद असणारे दोन तरुणही खुश होतात.
पण हळूहळू जसे दार उघडते त्या महिलेचा चेहरा दिसू लागतो. ती एक वृद्ध महिला असते त्यामुळे या दोघांचा पचका उडतो. ही व्हिडीओ ऐकून हसून आवरत नसेल त्यापेक्षा मजेशीर या Video ला पाहणे आहे. Video सोशल मीडियावर इतकी Viral आहे की एकूण ७,६०० पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या Video ला लाईक केले आहे. २६० हून अधिक कमेंट्स आहेत.
Video खाली आलेली नेटकऱ्यांची प्रतिक्रिया तर या Video पेक्षाही जास्त मजेशीर आहे. एका नेटकऱ्याने ‘बस…अशी cool आज्जी बनेन एकेदिवशी’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर एका नेटकाऱ्याने “Arey hi tr saru aaji ahe… Serial sodun firayla geli watta” अशी मिश्किल कमेंट केली आहे. तर एका नेटकाऱ्याने “आज्जी तुमच्या हातातच तिरडीचा दांडा आहे फक्त तुम्ही वापर चुकीच्या जागी करताय” अशी हसण्याची कमेंट केली आहे.






