१५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; १०० मीटरच्या राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष
या रॅलीचे प्रमुख आकर्षण तब्बल 35 हजार स्क्वायर फीट लांबीचा राष्ट्रध्वज असणार आहे. डोंबिवलीतील विविध संस्था, सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक या भव्य तिरंग्यासह रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीच्या रस्त्यांवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवणे, हा या रॅलीमागील प्रमुख उद्देश आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन तिचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे. “तिरंगा ही आपल्या देशाच्या अभिमानाची आणि एकतेची ओळख आहे. 35 हजार स्क्वायर फीट च्या राष्ट्रध्वजासह डोंबिवलीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, देशप्रेम आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला डोंबिवलीत होणाऱ्या या रॅलीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषद शिवसेना आमदार राजेश मोरे केडीएमसी उपमहापौर राहुल दामले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शिवसेना पदाधिकारी विवेक खामकर, फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै उपस्थित होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे असा आवाहन करण्यात आले आहे
१५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या रॅलीमध्ये तब्बल 35 हजार स्क्वायर फीट लांबीचा राष्ट्रध्वज हे मुख्य आकर्षण असणार आहे. विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन हा भव्य तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी होणार आहेत. यामुळे रॅलीचा उद्देश केवळ राजकीय कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये वाढवणे असा असल्याचे आमदार राजेश मोरे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
तसेच “डोंबिवलीत तिरंगा रॅलीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १८ मे २०२५ रोजीही डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. त्या वेळी हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी 35 हजार स्क्वायर फीट चा राष्ट्रध्वज हे विशेष आकर्षण ठरणार आहे.”
15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या






