डोंबिवली : सध्या रिक्षाचालकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. असाच एक प्रकार डोंबिवलीमधील रिक्षा चालक संघटना डोंबिवली वेस्ट मध्ये महात्मा फुले रोड साईबाबा मंदिरासमोर रिक्षा घुसावाघुसावी करताना दोन रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची झालीया आणि बाचाबाचीचे रूपांतर मारहाणी मध्ये झाले वारंवार रिक्षाचालकाचे अध्यक्ष आणि तेथील कार्यकर्त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी सांगूनही काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही घटना घडली आहे असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची त्याचबरोबर रस्त्याच्या मधून घुसावाघुसावी ही होतच असते परंतु त्या रिक्षाचालकांना वेळोवेळी सांगितले जाते की, अशा प्रकारचे वर्तन करू नका जेणेकरून कोणतीही अनैतिक घटना घडू नये. परंतु काल रात्रीच्या सुमारास अशीच एक घटना घडली आणि दोन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये शांताराम पतंगाले यांना कौशल भोईर यांनी बेदम मारहाण केली आहे. परंतु वारंवार सांगून सुद्धा असे प्रकार चालूच आहेत. या घटनेच्या संदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि वाहतूक कार्यालयामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तेथील नागरिकांची मागणी आहे.






