मुंबईला क्रीडा केंद्र बनविण्यासाठी, ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन व एम.एस.एस.ए यांची भागीदारी
मुंबई : ड्रीम स्पोर्ट्स या प्रख्यात क्रीडा संस्थेच्या, ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन (डी.एस.एफ) या सामाजिक सेवा विभागाने, भारतातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित शालेय क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एम.एस.एस.ए) यांच्याशी पाच वर्षांसाठी भागीदारी करण्याची घोषणा केली. या करारानुसार मुंबई शालेय क्रीडा क्षेत्रातील एकूण २० क्रीडा क्षेत्रांचा विकास करण्यात येणार असून, त्यामध्ये हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, ॲथलिटिक, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळांवर विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे.
भागीदारीचे उद्देश्य
दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, यशस्वी जयस्वाल, पृथ्वी शॉ आणि यांच्यासारखे अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या तारुण्यात, स्पर्धांमध्ये खेळून घडले असून, शहरातील क्रीडा विकासात एमएसएसएने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. एमएसएसए यांनी डीएसएफच्या प्रयत्नातून क्रिडा क्षेत्रातील युवा खेळाडूंमध्ये स्पर्धात्मकता आणि कौशल्य वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. एमएसएसए आणि डीएसएफच्या एकत्रित काम करण्यामुळे तळागाळातील क्रिडा गुणवत्तेचा विकास शक्य आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२४ यानुसार, स्पर्धा आयोजनातील दर्जा उंचावण्याचे या भागीदारीचे उद्देश्य आहे.
भारताला क्रीडा महाशक्ती बनविण्याचा आमचा हा प्रयत्न
ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे मुख्य संचालन अधिकारी व सह संस्थापक श्री.भावित शेठ म्हणाले, “मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन बरोबर जोडले गेल्यामुळे, मुंबईच्या पायाभूत स्तरावर रुजलेल्या क्रीडा संस्कृतीशी सुद्धा जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याच्या आमच्या मोहिमेशी ही योजना मिळती जुळती असून, मुंबईतील युवा खेळाडूंना पाठिंबा देऊन त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आणि भारताला क्रीडा महाशक्ती बनविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”
डीएसएफच्या महत्वाकांक्षी व भविष्याला गवसणी घालणाऱ्या योजना
या भागीदारीच्या माध्यमातून मुंबईतील हजारो शालेय खेळाडूंमधील शिस्त व तंदुरुस्ती यात वेगाने सुधारणा करून, स्थानिक स्पर्धांचा दर्जा उंचावण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच, युवा खेळाडून्ना शारीरिक शिक्षण, प्रशिक्षक व क्रीडा प्रशिक्षक या सर्वांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांचाही दर्जा उंचावण्याचा डीएसएफचा प्रयत्न आहे. मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रेव्हरंड ज्युड रॉड्रिक्स म्हणाले, “ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनशी भागीदारी केल्यामुळे मुंबईच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी आम्ही निश्चितपणे आगेकूच केली आहे. तसेच, या भागीदारीमुळे डीएसएफच्या महत्वाकांक्षी व भविष्याला गवसणी घालणाऱ्या योजनांच्या साहाय्याने मुंबईतील खेळाडू निश्चितपणे वेगाने प्रगती करतील अशी आमची खात्री आहे. इतकेच नव्हे तर मुंबईच्या दैदिप्यमान क्रीडा परंपरेच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे.”