गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! (Photo Credit- X)
गुजरात: गुजरात दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि दमन गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत वलसाड जिल्ह्यातील वापी येथून सुमारे ६ किलोग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा ३०० किलोग्रॅम कच्चा माल आणि अनेक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी मेहुल ठाकूर, विवेक राय आणि मोहनलाल पालीवाल हे दमनजवळील एका फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची निर्मिती करत होते. तयार झालेला माल वापी येथील चला रोड परिसरात मनोज सिंग ठाकूर यांच्या बंगल्यात साठवला जात होता.
या माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने दमन गुन्हे शाखा आणि वलसाड स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) सोबत संयुक्तपणे वापीतील बंगला आणि दमनमधील फार्म हाऊसवर छापे टाकले.
Daman, Gujarat: ATS, along with Valsad SOG and Daman Police, busted a major MD drugs racket in simultaneous raids at Vapi’s Chala area and Daman. Over 5.9 kg of MD drugs worth ₹30 crore was seized from a bungalow in Chala. One accused, Mohan Paliwal, was arrested while two… pic.twitter.com/MpPGRt4RQR — IANS (@ians_india) October 3, 2025
दमन येथील फार्म हाऊसवरील कारवाईत ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आला.
एटीएसने गुरुवारी रात्री छापा टाकून आरोपी मोहनलाल पालीवाल याला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल ठाकूर आणि केमिस्ट विवेक राय हे दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. दमन गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.