Yamaha च्या 'या' बाईक झाल्या भरमसाट स्वस्त!
भारतीय बाजारात स्टायलिश बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याच्या मायलेज आणि किमतीकडे लक्ष देत होते. मात्र, आजचा वाहन खरेदीदार बाईक खरेदी करताना त्याच्या स्टायलिश लूककडे सुद्धा जास्त लक्ष देतात. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या उत्तम आणि आकर्षक लूक असणाऱ्या बाईक लाँच करतात.
भारतातील दुचाकी कंपन्या त्यांच्या बाईक आणि स्कूटरच्या किमती सातत्याने कमी करत आहेत, कारण सरकारने अलीकडेच 350 सीसी पर्यंतच्या बाईक आणि स्कूटरवरील जीएसटी कमी केला आहे. भारतात अनेक वर्षांपासून Yamaha उत्तम लूक असणाऱ्या बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे. जीएसटी कमी झाल्याने कंपनीच्या बाईकच्या किमतीत सुद्धा घट झाली आहे. यानुसार, यामाहा मोटर इंडियाने त्यांच्या बहुतेक मॉडेल्सच्या किमती आधीच अपडेट केल्या होत्या, परंतु R3 आणि MT-03 च्या किमती बदलल्या नव्हत्या. आता, कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या दोन्ही बाईकच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. तसेच कंपनीने दोन्ही बाईकच्या किमतीत 20 हजार रुपयांनी कपात केली आहे.
फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
ज्यावेळी यामाहाने भारतात R3 आणि MT-03 लाँच केली होती तेव्हा लोकांना त्यांच्या किमती थोड्या जास्त वाटल्या. त्यामुळे कंपनीने नंतर दोन्ही बाईकच्या किमती 1 लाखांपर्यंत कमी केल्या, ज्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. आता, सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर, त्यांच्या किमती आणखी कमी झाल्या आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या भारतात विक्रीसाठी असलेले R3 आणि MT-03 हे जुने मॉडेल्स आहेत. यामाहाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मॉडेल्सचे लेटेस्ट व्हर्जन लाँच केले होते, परंतु नवीन मॉडेल्स भारतात कधी येतील हे अद्याप स्पष्ट नाही.
जर तुम्ही या 321cc यामाहाच्या बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता योग्य वेळ आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या यामाहा ब्लू स्क्वेअर डीलरशिपला भेट देऊन त्यांच्या ऑफर तपासू शकता. सणासुदीच्या काळात, तुम्हाला यामाहा डीलरशिपवर या यामाहा बाईकवर इतर अनेक ऑफर देखील मिळू शकतात, ज्यात एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट डिस्काउंट, बोनस यांचा समावेश आहे.