सातारा : राज्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. या पावसाने राज्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ
झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पावसामुळे कोयना धरणही (Koyna Dam) प्रभावित झालं असून या वर्षी धरणात 93.87 टीमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण पूर्णपणे भरुन अधिकचा धोका निर्माण होऊ नये म्हणून वाढती आवक पाहताच विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
[read_also content=”बीडमध्ये कार आणि टेम्पोत धडक, सहा जणांचा जागीच मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/car-and-tempo-collide-in-beed-six-die-on-the-spot-nrps-315825.html”]
राज्यात गेल्या 5-6 दिवसापासून कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच पाऊस झाला. आता सध्या राज्यात पाऊस ओसरला असला तरी नदी, नाले, ओढे आणि लहान-मोठे जलस्त्रोत यामधून धरणांमध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यामुळे राज्यभरातील धरणे आता ‘ओव्हरफ्लो’ च्या स्थितीमध्ये आहे. सोलापूरातील उजनी, गडचिरोलीतील मेडीगट्टा या धरणापाठोपाठ आता (Koyna Dam) कोयना धरणातील पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोयना नदीनमध्ये विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी (Heavy Rain) दमदार पाऊस झाल्याचा परिणाम आता पाहवयास मिळत आहे. चक्री दरवाजे उचलल्याने 18 हजार 780 क्यसेक तर पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
[read_also content=”हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मघरी तिरंगा ध्वजारोहण https://www.navarashtra.com/maharashtra/tricolor-flag-hoisting-at-the-birthplace-of-martyr-babu-genu-nrab-315907.html”]






