
महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
Nashik and Palghar Earthquake news Marathi: महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी (25 जुलै 2026) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नाशिक आणि परिसरात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी नोंदवण्यात आली. धक्के जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. काही वेळासाठी घबराट निर्माण झाली असली तरी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्येही शनिवारी सकाळी 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.57 वाजता हा भूकंप झाला असून त्याचे केंद्र दहाणू तालुक्यातील गंजाड परिसरात होते.
पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाचा प्रभाव कायम आहे. अशातच भूकंपाचे धक्के जाणवल्याने विशेषतः दहाणू, तलासरी आणि दुंडलवाडीसह आदिवासीबहुल भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दहाणू आणि तलासरी परिसरात यापूर्वीही कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के अनेकदा जाणवले आहेत. मात्र, गेल्या काही काळात या भागात भूकंपाची नोंद झाली नव्हती. त्यामुळे शनिवारी सकाळी आलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
An earthquake of magnitude 3.6 struck the Nashik region on July 25, 2026, at 9:55 AM IST: National Center for Seismology pic.twitter.com/C0KT2wwlE6 — IANS (@ians_india) July 25, 2026
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांकडून सर्व घडामोडींवर सतत नजर ठेवली जात असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे