Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे (फोटो सौजन्य: iStock)
तेहरान विद्यापीठाच्या भूकंपशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे १२ किलोमीटर खोलीवर होता. कमी खोलीवर होणारे भूकंप सामान्यत: पृथ्वीच्या पृष्ठभागावर तीव्रतेने जाणवतात. यामुळे खुजेस्तानच्या सरंद आणि आसपासच्या भागात जोरदार हादरे बसले. यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या भूकंपानंतर स्थानिक सरकार अलर्टमोडवर आहे. परंतु या भूकंपात कोणतीही जावित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपत्कालमनी पथकांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे.
इराण हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशापैकी एक मानला जातो. आकडेवारीनुसार, गेल्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ८७ भूकंपांतीन नोंद झाली होती. यातील बहुतेक भूकंप ३ तीव्रतेपेक्षा कमी होते. यामुळे कोणताही धोका नव्हता.
यापूर्वी मार्च २०२५ ते मार्च २०२६ च्या कालवधीत इराणमध्ये २.५ तीव्रतेचे तब्बल २,३८० भूकंप नोंदवले गेले. यातील काही भूकंपाची तीव्रता ४ पेक्षा अधिक होती, तर काही भूकंपांनी ५.० रिश्टर स्केल तीव्रता गाठली होती.
तज्ज्ञांचे मते, इराण हा अरबियन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सवर स्थित आहे. या प्लेट्स सतत एकमेकांवर धडकत असतात, ज्यामुळे जमिनीखाली ताण निर्माण होतो. या तणावामुळे भूकंप घडतात.
#Breaking
🚨Strong Ground Shaking Reported Across Southwestern #Iran 📌Residents across Iran’s Khuzestan Province are reporting #earthquake-like shaking at approximately 5:55–6:00 a.m. local time. https://t.co/3vs71asOoB
📍 Report From…
• Ahvaz • Dezful • Shush •… pic.twitter.com/BmKxbRgQeL — ⚡️🌎 World News 🌐⚡️ (@ferozwala) July 19, 2026
…तर UN वरील विश्वास उडेल; UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर; संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा
बातमी अपडेट होत आहे.






