Peru Earthquake : पेरुत निसर्गाचा कहर! अँडीज पर्वतरांगेत शक्तिशाली भूकंपात ५ जणांचा मृत्यू, अनेक घरे जमीनदोस्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना
अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, शनिवारी (१९ जुलै) स्थानिक वेळेनुसार ९.२४ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआनकायो प्रदेशातील सिकाय शहराच्या पासून २ किलोमीटर अंतरावर होता. याची खोली जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर असल्याने जोरदार झटके जाणवले.
या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. सिकाय आणि आसपासच्या परिसरातील अनेक घरे ढासळली आहेत. स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे ३०० हून अधिक लोक बेघर झाले आहे. अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
कोसळलेल्या इमारतींमध्ये चर्च आणि कॉन्व्हेंटचाही समावेश आहे. अँडीज परिसरातील अनेक घरे मातीच्या विटा आणि पारंपारिक बांधकाम पद्धतीने उभारण्यात आली आहेत. यामुळे ही घरे भूकंपाचे धक्के सहन करुन शकली नाहीत. जोरदार धक्क्यांमुळे इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांतील घरे कोसळ्याने लोकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर यावे लागले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून तात्पुरत्या निवाऱ्याचा शोध घेत आहेत.
पेरु हा प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या भूकंपप्रवण पट्ट्यावर स्थित आहे. या भागातील टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या हलचालींमुळे भूकंपाचा धोका कायक असतो. यापूर्वी २००७ मध्ये पेरुच्या पिस्को प्रांतात ७.९ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. यामध्ये सुमारे ६०० लोक मृत्यूमुखी पडले होते.
स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आपत्कालीन सेवा आणि बचाव पथके मदत आणि बचावकार्य करत आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. बचाव अधिकारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बाधित कुटुंबांना आपत्कालीन मदत पुरवली जात आहे.
🚨🇵🇪#BREAKING | NEWS ⚠️
6 People have been killed in Peru
after a 5.5⚡️Magnitude Earthquake struck central Peru yesterday. pic.twitter.com/bS1xq43iHN — Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) July 19, 2026






