Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्याच्या दरात झाली विक्रमी वाढ; 15 दिवसांमध्ये 18 रुपयांनी अंडी महाग

आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडींसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2025 | 09:13 AM
अंड्याच्या दरात झाली विक्रमी वाढ; 15 दिवसांमध्ये 18 रुपयांनी अंडी महाग

अंड्याच्या दरात झाली विक्रमी वाढ; 15 दिवसांमध्ये 18 रुपयांनी अंडी महाग

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील बाजारपेठांमध्ये अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात धाराशिव, लातूरसह काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती. त्यामुळे शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्याचा फटका आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे साखळी पुरवठ्यावर परिणाम झाला. यामुळे अंडींचे दर कमालीचे वाढले आहेत.

एकीकडे मागणी जास्त आणि उत्पादनावर परिणाम या व्यस्त प्रमाणामुळे अंड्यांचा भाव वधारला आहे. आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडींसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला आहे.

वाहतुकीतील अडथळ्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला. उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. लोखंडवाला येथे अंडी ९० रुपये, वांद्रे आणि बोरिवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपय दराने विकली जात आहेत. ऑनलाईन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे ११७रुपये डझन दर मोजावा लागत आहे. सहा ‘स्पेशल अंडी’च्या बॉक्सची किंमत ५७ रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे.

दरम्यान, पुण्यात अंड्याचा दर १५ दिवसांत ६६ वरून ८४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एनईसीसीनुसार जून २०२५ मध्ये दर पाच वर्षांत सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. इतकेच नाही तर अंडा भुर्जी आणि इतर खाद्यपदार्थासाठी सुद्धा ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

Web Title: Egg prices hit record high eggs become expensive by rs 18 in 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • Egg
  • Inflation
  • maharashtra

संबंधित बातम्या

Motilal Nagar redevelopment: मोतीलाल नगर पुनर्विकासावर नवा वाद; इस्टेटव्ह्यूकडून विकास समितीच्या आरोपांचे खंडन
1

Motilal Nagar redevelopment: मोतीलाल नगर पुनर्विकासावर नवा वाद; इस्टेटव्ह्यूकडून विकास समितीच्या आरोपांचे खंडन

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड
2

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

World No Tobacco Day : तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी
3

World No Tobacco Day : तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी

Health Department : शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र
4

Health Department : शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.