Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा माजी मंत्र्याला आदेश, नेमकं काय घडतंय?

एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमराजे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचं समजताच सावंत तत्काळ धाराशिवच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 02:13 PM
ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा माजी मंत्र्याला आदेश, नेमकं काय घडतंय?

ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा माजी मंत्र्याला आदेश, नेमकं काय घडतंय?

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतत खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटातील शिवसेने (UBT) मध्ये आंतरिक संघर्ष तीव्र झाला आहे. पक्षातील ६ बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले आहे. या खासदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. सतत संपर्क साधला जात आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

ओमराजे निंबाळकरही आपली भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत. धाराशिवमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी सावंतांना मोठे आदेश दिले आहेत. ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहणार आहेत, तशा शिंदेंच्या सूचना आहेत. तानाजी सावंत पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. सोमवारी येतो, असा निरोपही मातोश्रीवर ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे आदेश तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ओमराजे यांना पुण्यातून दिल्लीला आणण्याची जबाबदारी सावंत यांच्यावरच होती. तेच या ऑपरेशनला लीड करत होते. आता ओमराजे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचं समजताच ते तत्काळ धाराशिवच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ते धाराशिवला ओमराजे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ओमराजे आज सकाळी पुण्याहून धाराशिवला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा आहे. धाराशिवला पोहोचल्यानंतर ओमराजे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

हे सुद्धा वाचा : ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

सोमवारी मातोश्रीवर येऊन वैयक्तीक भूमिका मांडतो, असेही ओमराजे निंबाळकर यांनी निरोप दिल्याची माहिती मिळत आहे. ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या अगोदरच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून मातोश्रीवर येण्याचे आश्वासन देण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली.

Web Title: Eknath shinde has instructed tanaji sawant to visit dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर
1

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
2

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?
3

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर
4

पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.