Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! पायलटच्या धाडसामुळे उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचला

Eknath Shinde News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ऐरोलीवर आलेल्या वादळामुळे वैमानिकाने हेलिकॉप्टर परत फिरवले. वाचा या थराराबद्दल सविस्तर माहिती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 07, 2026 | 06:32 PM
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! (Photo Credit- X)

एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला!
  • पायलटच्या धाडसामुळे उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचला
  • पवन हंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग
Eknath Shinde Helicopter Accident Averted: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एका भीषण हवाई अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. खराब हवामान आणि अचानक आलेल्या वादळामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला हवेतच मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे व्हीआयपी (VIP) सुरक्षा आणि हवाई प्रवासातील जोखमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुरबाडकडे जाताना ऐरोलीवर दाटले संकटाचे ढग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून मुरबाडकडे रवाना झाले होते. दुपारी साधारण 3:30 वाजता त्यांचे हेलिकॉप्टर महालक्ष्मी रेसकोर्सवरून हवेत झेपावले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच, जेव्हा हेलिकॉप्टर ऐरोली परिसराच्या वर पोहोचले, तेव्हा अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाची लक्षणे दिसू लागली.

Maharashtra: Office of Deputy Chief Minister Eknath Shinde- “Deputy Chief Minister Eknath Shinde’s helicopter went out of its scheduled route this afternoon. However, due to the pilot’s timely alertness and presence of mind, the helicopter was turned back and safely landed at the… pic.twitter.com/jCGMLzqBAq — ANI (@ANI) May 7, 2026

Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

वैमानिकाची सतर्कता आणि ‘लाईफ-सेव्हिंग’ निर्णय

हेलिकॉप्टर ऐरोलीच्या आकाशात असताना समोरून वेगाने येणाऱ्या चक्रीवादळाचा अंदाज वैमानिकाला आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने त्वरित उपमुख्यमंत्र्यांना संभाव्य संकटाची कल्पना दिली. पुढे जाणे जीवघेणे ठरू शकते, असा सल्ला देत वैमानिकाने पुढे जाण्याऐवजी माघारी फिरण्याचा धाडसी निर्णय घेतला. वैमानिकाने विनाविलंब हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते सुरक्षित दिशेला वळवले.

पवन हंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग

वैमानिकाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे काही मिनिटांतच हेलिकॉप्टर जुहू येथील ‘पवन हंस’ हेलिपॅडवर सुखरूप उतरले. उपमुख्यमंत्री कार्यालयाने (DCM Office) या घटनेला दुजोरा दिला असून, या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. वैमानिकाने दाखवलेल्या तत्परतेचे आणि कौशल्याचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वादळाचा मोठा फटका बसण्याची होती शक्यता

उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समोर हवामानाची स्थिती अत्यंत बिघडलेली असल्याने हेलिकॉप्टरने आपला निर्धारित मार्ग बदलला होता. ऐरोलीच्या आकाशात वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब इतका वाढला होता की, जर प्रवास सुरू ठेवला असता तर हेलिकॉप्टरचे संतुलन बिघडून मोठा अपघात झाला असता. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विमान मुंबईच्या दिशेने परत वळवण्यात आले. या थरारानंतर आता एकनाथ शिंदे रस्तेमार्गाने पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याचे समजते.

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

Web Title: Eknath shinde helicopter escapes crash due to storm pilot alertness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • eknath shinde news
  • helicopter
  • maharashtra

संबंधित बातम्या

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
1

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’
2

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
3

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
4

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.