Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

शिर्डीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचा आरोप करत, देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण करण्याची साईबाबांकडे प्रार्थना केल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 03:40 PM
अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी दौऱ्यातून पुन्हा एकदा भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना त्यांनी खासदार फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचा आरोप केला. तसेच, “देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर,” अशी प्रार्थना आपण साईबाबांच्या चरणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

“फोडाफोडीसाठी शाहसेनेला सुपारी दिली”

उद्धव ठाकरे म्हणाले की, 2029 नंतर देशात पंतप्रधानपदासाठी नवे चेहरे पुढे येऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं नावही चर्चेत येऊ शकतं. त्यामुळेच त्यांना राज्यातच अडकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचा राजकीय प्रभाव मर्यादित करण्यासाठी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, शिवसेनेतील खासदार फोडण्यामागेही हाच मोठा राजकीय डाव असून, आता शिंदे गटाकडे भाजपपेक्षा अधिक खासदार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीकेची झोड

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. “हे भाऊसाहेब नाहीत, तर खाऊसाहेब आहेत,” असा टोला लगावत त्यांनी वाकचौरे यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 2009 मध्ये शिवसेनेने त्यांना निवडून आणले, 2014 मध्ये त्यांनी पक्ष सोडला, पुन्हा परत आले आणि आता पुन्हा पक्षत्याग केला. “थोडा संयम ठेवला असता तर भविष्यात आपलंच सरकार आलं असतं,” असेही ठाकरे म्हणाले.

“खासदार फोडायला पैसे आहेत”

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर पैशांच्या जोरावर राजकारण केल्याचा आरोप केला. “जनतेच्या कराच्या पैशातून विकास करायचा सोडून खासदार फोडण्यासाठी पैसा वापरला जात आहे,” असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचाही उल्लेख करत, “शेतकऱ्यांकडे बैल नाहीत, त्यांच्या पत्नी नांगर ओढत आहेत; पण सरकारकडे मात्र खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत,” अशी टीका केली.

“देवेंद्र फडणवीसांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावं लागतं”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंख छाटले” हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मराठी भाषेच्या ज्ञानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फडणवीस यांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावे लागत असल्याचा दावा करत, “संघाचा पाठिंबा फडणवीस आणि नितीन गडकरी यांना आहे,” असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

“तीन वर्षांत सरकार बदलू शकतं”

सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आत्मविश्वास व्यक्त केला. “आज परिस्थिती वेगळी असली तरी पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रात पुन्हा आपले सरकार येऊ शकते. खासदारांचे जाणे हा पराभव नसून भविष्यासाठी शुभ संकेत आहे,” असे ते म्हणाले. .त्यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन करत, “श्रद्धा आणि सबुरी ठेवा, योग्य वेळी जनताच उत्तर देईल,” असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Uddhav thackeray on amit shah eknath shinde devendra fadnavis shirdi sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Amit Shah
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
1

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
2

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
3

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.