Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 03:11 PM
चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
  • म्हणाले- ‘अशा नराधमांना…’
  • वाचा संपूर्ण बातमी
Devendra Fadnavis on Nasrapur Case: नसरापूर येथे एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या दोषी व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे मनापासून आभारही मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणांचे कौतुक केले.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले: “त्याला फाशी द्या! हे कायद्याचे राज्य आहे आणि येथे गुन्हेगारांना कोणताही थारा नाही. आज न्यायालयाने नसरापूर येथील एका लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे आणि महिला व मुलींविरुद्ध अत्याचार करणाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट इशारा आहे. यातून असा कडक संदेश जातो की, पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.”

सरापूर प्रकरणातील न्यायामुळे सर्वांना समाधान वाटत आहे

एकनाथ शिंदे पुढे लिहितात, “समाजात किंवा कायद्याच्या राज्यात अशा नराधमांना कोणतेही स्थान नाही. त्यांना जगण्याचा अधिकार नाही! महिला आणि मुलींवरील अत्याचारांबाबत ‘महायुती’ सरकारने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात राहावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना करत आहे. जलद तपास, फास्ट-ट्रॅक न्यायालयात खटला चालवणे आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आज नसरापूर प्रकरणातील न्यायामुळे सर्वांना समाधान वाटत आहे.”

Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

Web Title: Chief minister devendra fadnaviss first reaction after the little girls killer was sentenced to the gallows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
2

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
3

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
4

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.