Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ राज्यांचा निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात ; शरद पवार यांचा दावा

देशातील ७० टक्के राज्यांत भाजपची सत्ता नाही, सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

  • By Aparna
Updated On: Oct 22, 2023 | 05:52 PM
५ राज्यांचा निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात ; शरद पवार यांचा दावा
Follow Us
Follow Us:

बारामती : देशातील ७० टक्के राज्यांत भाजपची सत्ता नाही, सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बारामती दौऱ्यावर रविवारी  पवार होते, त्यावेळी त्यांनी मध्यामांशी संवाद साधला,५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार ,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात. यावर पवारांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले , बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही.अखंड देशाला बारामतीचे महत्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात, असे पवार म्हणाले.चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे, मला माहित नाही.ज्या व्यक्तिला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे म्हणत पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला.

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल,असे पवार म्हणाले.

कंत्राटी भरती बाबत बोलताना पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही.जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. हा आमचा आग्रह होता, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले ,इंडिया आघाडीमध्ये जे जे लोक सहभागी होतील. त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Election results in 5 states against bjp sharad pawars claim nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 05:48 PM

Topics:  

  • baramati
  • Pune
  • pune news
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
1

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
2

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
3

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
4

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.