कल्याण : कल्याण पश्चिम (Kalyan West) विधानसभा मतदार संघातील एकमेव ग्रामपंचायत (Grampanchayat) असलेल्या नांदप गावातील (Nandap Village) काही भागात वीज समस्या (Electricity Problem) निर्माण झाली होती. याबाबत नांदप गावचे सरपंच अरुण शेलार (Sarpanch of Nandap village Arun Shelar) आणि सदस्य जयेश शेलार (Member Jayesh Shelar) यांनी ही बाब आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) यांना सांगताच आमदारांनी याबाबत महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांना निर्देश देत २४ तासांत येथील वीज समस्या निकाली निघाली आहे.
टिटवाळ्याजवळ असलेल्या नांदप ग्रामपंचायत हद्दीतील हिंदुस्थान नगर, महादेव नगर या भागात शनिवार पासून वीज नव्हती. या ठिकाणची डीपी गेल्याची माहिती सोमवारी नांदप गावचे सरपंच अरुण शेलार, उपसरपंच आदेश शेलार आणि सदस्य जयेश शेलार यांना मिळताच त्यांनी याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांना माहिती दिली.
[read_also content=”UP: अतिक अहमदच्या वकिलाच्या घराजवळ फेकले बॉम्ब, हल्लेखोराने केले अनेक स्फोट; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/murder-case-update-up-bomb-thrown-near-atiq-ahmeds-lawyers-vijay-mishra-house-attacker-did-several-blasts-nrvb-387091.html”]
या परिसरात दीड ते दोन हजार लोकवस्ती असून वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदारांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथील वीज समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २४ तासांच्या आतच याठिकाणी नवीन डीपी बसविण्यात आली आहे. यामुळे येथील वीज पूर्ववत झाली असून नागरिकांनी आमदार, गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे आभार मानले आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
दरम्यान हा परिसर गेल्या आठवड्याभरापासून अंधारात असल्याची खोटी माहिती समाजमाध्यमांवर पसरविण्यात आली होती. ही माहिती मिळताच नांदप गावच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या ठिकाणी धाव घेत हा प्रकार आमदारांच्या निदर्शनास आणून देत आमदारांनी ही समस्या निकाली काढली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानत नांदप ग्रामपंचायत परिसरात नागरिकांना कोणतीही समस्या असल्यास नागरिकांनी ग्रामपंचायत कमिटीला संपर्क करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य जयेश शेलार यांनी केले आहे.