Maharashtra breaking News Marathi
गोरेगावमध्ये घराला भीषण आग; फ्रीज स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू
मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील भगतसिंह नगर येथील एका सोसायटीतील घराला पहाटे भीषण आग लागून तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गाढ झोपेत असतानाच घरातील फ्रीजचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत घरात अडकलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
10 Jan 2026 06:12 PM (IST)
Shubman Gill’s comments about the T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी-२० विश्वचषकाला काही दिसव शिल्लक आहे. सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने काही आठवड्यापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला वगळले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच गिलने आपले मौन सोडले आहे. रविवार (११ जानेवारी २०२६) पासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, गिल म्हणाला की तो निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि स्पर्धेत संघाला शुभेच्छा देतो.
10 Jan 2026 05:40 PM (IST)
जानेवारी 2026 मध्ये Hyundai India ने आपल्या जवळपास संपूर्ण पॅसेंजर व्हेईकलवर आकर्षक कन्झ्युमर डिस्काउंट ऑफर्स जाहीर केले आहेत. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस तसेच निवडक कॉर्पोरेट आणि सरकारी सवलतींचा समावेश आहे. मात्र, सवलतीची रक्कम मॉडेल, व्हेरिएंट, फ्युएल टाइप आणि शहरानुसार वेगवेगळी असू शकते.
10 Jan 2026 05:31 PM (IST)
ओडिशातील राउरकेला हवाई पट्टीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एका चार्टर्ड विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडानंतर अवघ्या १० किलोमीटर अंतरानंतर लँडिंग करण्यात आले. या अपघातात पायलटला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण सहा जण जखमी झाले आहेत. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले, ज्यामुळे सर्वांना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
10 Jan 2026 05:13 PM (IST)
“आम्ही केवळ आश्वासने देणारे नाही तर ते पूर्ण करणारे आहोत. विधानसभा निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश प्राप्त झाले. त्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करतील असे म्हणायला सुरूवात केली. मात्र जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे.” असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
10 Jan 2026 04:50 PM (IST)
सानपाडा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डिंपल ठाकूर यांच्या प्रचार कार्यालया समोर करणीचा प्रकार समोर आला आहे. ताटात जेवण, दिवा, दारू आणि रक्त तसंच टोपलीत मडके, फळांचे साल इत्यादी पदार्थ ठेवलेले आढळले.हा सगळा प्रकार उघडकीस झाल्यावर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
10 Jan 2026 04:45 PM (IST)
रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे आज १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहिती नुसार दोन दुचाकींपैकी एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने जात होती, तर दुसरी दुचाकी मिऱ्याकडून रत्नागिरी शहरात येत होती. भाटी मिऱ्या येथील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींपैकी एकाच्या दातासह जबडा शरीराबाहेर आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अन्य एक जण गंभीर जखमी असून तिसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
10 Jan 2026 04:40 PM (IST)
(तळा श्रीकांत नांदगावकर)तळा बसस्थानकातील पिओपी शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान अचानक कोसळुन एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.तळा बसस्थानकाच्या दुरुस्तीच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात येऊन या कामाचे भूमिपूजन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले होते.फेब्रुवारी २०२४ मध्ये तळा बसस्थानक दुरुस्तीचे काम करण्यात येऊन अवघ्या दोन वर्षातच सदर बसस्थानकाची पिओपी कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू व शहर प्रमुख राकेश वडके यांनी घटनास्थळी पाहणी करून कामाबाबत नाराजी व्यक्त केली.संपूर्ण तालुक्याचं बसस्थानक कसे असावे,बसण्याची व्यवस्था कशी असावी याचे योग्य नियोजन संबंधित ठेकेदाराकडून केले गेले नसून दहा लक्ष रुपये मंजूर असलेल्या कामाला पाच लक्ष रुपये सुद्धा खर्च झालेले दिसत नाहीत.असा आरोपही त्यांनी यावेळी केला.याप्रसंगी नगरसेवक नरेश सुर्वे,सिराज खाचे,रितेश मुंढे व पदाधिकारी उपस्थित होते.
10 Jan 2026 04:35 PM (IST)
बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे वैर सर्वश्रुत आहे. मात्र मंत्री गणेश नाईक यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मंदा म्हात्रे आणि माझ्यात कसलच वैर नाही. याबाबत मंदा म्हात्रे यांना विचारल असता त्यांनी देखील याला दुजोरा दिलाय. गणेश नाईक आणि माझं वैर नाही. राजकारणाच्या खुर्चीत कोणी किती नगरसेवक आणावा अशी चढाओढ प्रत्येक पक्षात असते. त्यात आम्हा दोघांचे वैर काहीच नाही. आमच्यात भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूला घीरट्या घालणारे करत असतात. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आम्ही त्यांना नेतेच बोलतो. त्यांनी देखील संकुचित बुद्धीचं न राहता. सर्वांना समाविष्ट करून सर्व आपलेच आहेत अशा पद्धतीने तिकीट वाटप झालं असतं तर नवी मुंबईत हा प्रकार घडला नसता. असं आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय.
10 Jan 2026 04:30 PM (IST)
माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जे.पी. परदेशी यांच्या संकल्पनेतून रसायनी पाताळगंगा परिसरातील माजगाव केंद्रात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यातआले. स्पर्धेचे आयोजन राजिप शाळा तळवली येथे होते.शाळेचे मुख्याध्यापक मस्तान बोरगे, सहशिक्षक सुरेश मांडे सर आणि शाळा व्यवस्थापन समिती तळवली यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटन खालापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दीपा परब मॅडम यांचा हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे शिल्पा दास मॅडम (वरिष्ठ विस्तार अधिकारी) आणि रविंद्र रघुवंशी (युनिट हेड बिर्ला कार्बन )हे उपस्थित होते.
10 Jan 2026 04:25 PM (IST)
अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. त्या अहिल्यानगर येथे माध्यमांशी संवाद साधत होत्या.बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “याबाबत मला कोणतीही माहिती नाही. तसेच संबंधित व्यक्तीचा थेट आरोप मध्ये सहभाग असेल असे वाटत नाही मात्र तरीही मी तपासून प्रतिक्रिया देईल. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होत असलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून
10 Jan 2026 04:20 PM (IST)
निवडणुकीचे सत्र सुरू झाले की राजकीय पक्षांकडून जनतेच्या समस्या अग्रस्थानी मांडल्या जातात. मग त्या पाण्याच्या समस्या असोत, रस्त्यांच्या समस्या असोत किंवा वाहतुकीच्या अडचणी असोत. मीरा-भाईंदर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सुरू असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम नागरिकांसह रिक्षाचालकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या रोज ट्रॅफिक जॅम, प्रवाशांच्या तक्रारी अशा अनेक समस्यांना रिक्षाचालकांना सामोरे जावे लागत आहे.
10 Jan 2026 04:15 PM (IST)
काल मीरा-भाईंदर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजासाठी स्वतंत्र भवन, पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्प, क्लस्टर विकास आणि मेट्रो कारशेड यासंदर्भात भाष्य करत भविष्यात या सर्व बाबींवर सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
मात्र या सभेनंतर शिंदेसेना नेते व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कालच्या सभेत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. विशेषतः पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजप आमदार नरेंद्र मेहता हेच कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
10 Jan 2026 04:12 PM (IST)
जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले, शिरोळ, राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
10 Jan 2026 04:00 PM (IST)
India vs New Zealand, first T20 match ticket sales : विदर्भ क्रिकेट असोसिएशन २१ जानेवारी रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक टी-२० ट्रॉफीचा भाग म्हणून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जामठा येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जामठा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा पहिला द्विपक्षीय टी-२० सामना असणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री १७ जानेवारीपासून होणार आहे.
10 Jan 2026 03:50 PM (IST)
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथा आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा, लोभ आणि कर्म यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. काही लोकांसाठी भक्ती हा साधनेचा मार्ग आहे, तर काहींसाठी ती केवळ स्वार्थ साध्य करण्याचं साधन बनताना दिसते आहे. चुकीचे निर्णय, अति महत्त्वाकांक्षा आणि अंधश्रद्धेची सरमिसळ यामुळे घडणाऱ्या घटनांनी गावात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, मालिकेचा सध्याचा प्रवास प्रेक्षकांना सतत अंतर्मुख करत आहे खरी श्रद्धा नेमकी कोणती?
10 Jan 2026 03:45 PM (IST)
वाशीम: वाशीम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून एका महिलेचा भयानक अवस्थेत मृतदे आढळून आल्याचे समोर आले आहे, मृत महिलेचे डोकं पूर्णपणे ठेवण्यात आले आल्याचे निर्दर्शनात आले आहे. तिचे कपडे फाटलेल्या अवस्थेत आणि तिच्या हातावर ‘छाया मोहन’ नाव गोंदलेले आढळले. हा मृतदेह कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
10 Jan 2026 03:38 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्वचषकाआधी भारतीय संघाची महत्वाची मालिकेचा 11 जानेवारी रोजी शुभारंभ होणार आहे. दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. या मालिकेमध्ये पहिले तीन सामने हे एकदिवसीय मालिकेचे आयोजित केले आहेत, तर त्यानंतर पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारीवर एकदा नजर टाका.
10 Jan 2026 03:23 PM (IST)
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाने (JSSC) जेल वॉर्डर (कक्षपाल) पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १७३३ पदे भरली जाणार असून ९ जानेवारी २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार होती; मात्र काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती विशेषतः दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट jssc.jharkhand.gov.in वरून अर्ज करावा लागणार आहे.
10 Jan 2026 02:50 PM (IST)
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. 12 जानेवारीपासून या मालिकेत एक रहस्यमय वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे.मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक गूढ, अस्वस्थ करणारा आणि थरारक प्रवास. मनोजच्या मावसभावाच्या लग्नासाठी वल्लरी, मनोज आणि इंदू गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर इंदू काही दिवस गावीच थांबते, तर मनोज आणि वल्लरी रात्रीचा प्रवास करून घरी परतत असतात.
10 Jan 2026 02:40 PM (IST)
भारत आणि तालिबानच्या संबंधांना आता नवीन दिशा मिळणार आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबान सरकार पहिल्यांदाच भारतात दूतावासा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने देखील याला मान्यता दिली असून याची जबाबदारी लवकरच तालिबान अधिकारी मुफ्ती नूर अहमद नूर यांना सोपलण्यात येईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये तालिबानेच कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या दिल्ली भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि अफगाणिस्ताच्या तालिबान सरकारने राजनैतिक संबंध वाढवण्यावर करार केला आहे.
10 Jan 2026 02:35 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीचा धुराळा बसेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्या युतीला एकतर्फी यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही चांगले यश मिळेल. अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे. तथापि या निवडणुकीमध्ये मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रा संजय मंडलिक अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
10 Jan 2026 02:30 PM (IST)
इराणमध्ये (Iran) सध्या सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा लाव्हा उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत तेहरानच्या रस्त्यांवरून अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये इराणी महिला अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जळणाऱ्या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत आहेत. हे केवळ एक कृत्य नसून, दशकांपासून चाललेल्या अत्याचाराविरुद्ध पुकारलेले हे एक ‘महायुद्ध’ आहे.
10 Jan 2026 02:20 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचे तीन सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवार, ११ जानेवारी रोजी सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा बीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. वडोदरा १६ वर्षांच्या अंतरानंतर पुरुषांचा एकदिवसीय सामना आयोजित करेल. योगायोगाने, शहरात खेळलेला शेवटचा एकदिवसीय सामना २०१० मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रिलायन्स स्टेडियमवर झाला होता. भारताने तो सामना नऊ विकेट्सने जिंकला.
10 Jan 2026 02:15 PM (IST)
महाराष्ट्राचं तुफान 11 जानेवारीपासून थेट घराघरांत शिरण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर उद्यापासून सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत.
10 Jan 2026 02:08 PM (IST)
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळेवाडी येथील तरुण आणि तरुणीने जंगलात एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) असे आहे तर मुलगी अल्पवयीन आहे. आत्महत्येची घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
10 Jan 2026 01:58 PM (IST)
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली एअरटेल त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींचे प्लॅन्स आणि सर्विसेस ऑफर करत असते. प्रत्येक युजर्स त्यांच्या गरजेनुसार प्लॅन्स आणि सर्विसची खरेदी करतात. काही युजर्स प्रीपेड प्लॅन्स वापरतात तरी काही युजर्स पोस्टपेड प्लॅन्सचा वापर करतात. तुम्ही देखील भारती एअरटेलचे यूजर आहात का? तुम्ही सध्या प्रीपेड सर्विसचा वापर करत आहात क? तुम्हाला देखील प्रीपेडमधून पोस्टपेडवर स्विच करायचं आहे का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.
10 Jan 2026 01:52 PM (IST)
जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता इराणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना थेट धमकी दिली आहे. “ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी मादुरो यांच्या बेडरूममध्ये घुसून त्यांना अटक केली, त्याच पद्धतीने ट्रम्प यांनाही परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे इराणचे वरिष्ठ नेते हसन रहिमपूर अझघादी यांनी म्हटले आहे.
10 Jan 2026 01:47 PM (IST)
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. 12 जानेवारीपासून या मालिकेत एक रहस्यमय वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे.मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक गूढ, अस्वस्थ करणारा आणि थरारक प्रवास. मनोजच्या मावसभावाच्या लग्नासाठी वल्लरी, मनोज आणि इंदू गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर इंदू काही दिवस गावीच थांबते, तर मनोज आणि वल्लरी रात्रीचा प्रवास करून घरी परतत असतात. वाटेत एका अनोळखी ठिकाणी वल्लरीला एक लहान मुलगी एकटी, आई-वडिलांशिवाय बसलेली दिसते.
10 Jan 2026 01:35 PM (IST)
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% कर लादला आहे, परंतु तो १० पटीने वाढू शकतो. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी बुधवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५००% कर लादण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामध्ये भारत, चीन आणि ब्राझीलचा समावेश आहे. ईटीच्या अहवालानुसार, यामुळे विशेषतः भारताच्या कापड उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते. भारतीय कंपन्यांनी शरद ऋतू आणि हिवाळ्याच्या हंगामासाठी अमेरिकेत उत्पादन सुरू केले आहे. परंतु ५००% कर लादण्याचा धोका त्यांना रुळावरून नक्कीच गाडी घसरवू शकतो.
10 Jan 2026 01:25 PM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा खेळताना दिसतील. पहिला सामना वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जाईल. दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर शुभमन गिल या मालिकेत पुनरागमन करेल. या मालिकेत एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यर देखील पुनरागमन करत आहे आणि यामुळे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात.
10 Jan 2026 01:15 PM (IST)
महाराष्ट्राचं तुफान 11 जानेवारीपासून थेट घराघरांत शिरण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर उद्यापासून सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत.
10 Jan 2026 01:08 PM (IST)
मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ च्या (Malegaon Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कापड व्यापारी असोसिएशन यांची मतदान जनजागृतीसाठी बैठक झाली. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांनी मनपा क्षेत्रातील सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेऊन आपल्याकडे काम करणारे सर्व कर्मचारी वर्गाला तसेच आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रिय कर्तव्य पार पाडून भारताची समृध्द लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
10 Jan 2026 12:00 PM (IST)
आजच्या काळात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र राहिलेले नाही. आधार कार्ड एक महत्त्वाचा पुरावा बनला आहे, जो आपल्या प्रत्येक कामासाठी महत्त्वाचा आहे. शाळेत अॅडमिशन घेण्यापासून अगदी जॉबसाठी अप्लाय करण्यापर्यंत आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी फायद्याचं ठरतं. बँकिग, सिम कार्ड आणि अनेक ऑनलाईन सेवा थेट आधार कार्डसोबत जोडलेल्या असतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या आधार कार्डची माहिती एखाद्या चुकीच्या व्यक्तिच्या हाती लागली, तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हेच धोके लक्षात घेऊन UIDAI ने आधार सुरक्षेबाबत काही गाइडलाइंस जारी केल्या आहेत. तुम्हाला जर तुमची माहिती आणि आधार कार्ड डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतील तुम्हाला UIDAI च्या गाइडलाइंस लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
10 Jan 2026 11:50 AM (IST)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
10 Jan 2026 11:40 AM (IST)
अमेरिका आणि डेन्मार्कमध्ये पुन्हा एकदा ग्रीनलँडच्या मुद्यावरुन तणावा निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ग्रीनलँडहे आर्क्टिक प्रदेशातील भू-राजकीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. येथील दुर्मिळ खनिजे, युरेनियन, लोखंड यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा मोठा साठा आहे. यामुळेच यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न ट्रम्प करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान डेन्मार्कच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष आणि खासदार रास्मस जारलोव यांनी भारताकडे आणि आंतरराष्ट्रीय समुदायांकडे मदतीची हाक मारली आहे.
10 Jan 2026 11:30 AM (IST)
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) मधील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, साहिल केदारी आणि शमिका जांभुळकर या चारही उमेदवारांनी नेताजीनगर आणि बोराडेनगर भागातील नागरिकांशी पदयात्रेच्या माध्यमांतून संवाद साधला. या चारही उमेदवारांचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याचे पाहण्यास मिळाले.
10 Jan 2026 11:20 AM (IST)
बिहार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच दोन मुलांना विषारी गहू देऊन मारल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलीस ठाणे परिसरातील पथरा गावात घडली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. मात्र असं काय घडलं की आईनेच पोटच्या मुलांना मारलं, नेमकं कारण काय?
10 Jan 2026 11:10 AM (IST)
Thane Municpal election 2026: ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
10 Jan 2026 10:59 AM (IST)
२०२६ या वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी मोठ्या प्रमाणात अस्थिरतेने झाली आहे. शुक्रवार, ९ जानेवारी रोजी दलाल स्ट्रीटवर विक्रीचे वादळ आले, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक पत्त्यांच्या ढिगाऱ्यासारखे कोसळले. सुरुवातीच्या व्यवहारात थोडीशी वाढ झाल्यानंतर, बाजाराने आपले सर्व वाढ गमावली आणि सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ६०४.७२ अंकांनी म्हणजेच ०.७२% ने घसरून ८३,५७६.२४ वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी५० निर्देशांक १९३.५५ अंकांनी म्हणजेच ०.७५% ने घसरून २५,६८३.३० वर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सच्या ३० पैकी २१ समभाग तोट्याने बंद झाले. यापूर्वी, गुरुवारी, सेन्सेक्स ७८० अंकांनी घसरला होता.
10 Jan 2026 10:51 AM (IST)
अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच भारतात सुरु हेणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने या सेलची घोषणा केली आहे. येत्या काहीच दिवसांत कंपनीचा हा सेल सुरु होणार असून या सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आगामी सेलसाठी आता डेडिकेटेड माइक्रोसाइट अॅमेझॉनवर लाईव्ह झाली आहे. या मायक्रोसाईटवर सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बँक डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल माहिती देण्यात आली आहे.
10 Jan 2026 10:44 AM (IST)
राज्य सरकार जातीधर्माच्या नावाखाली जनतेला फसवून मते मिळवत आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिन्यात महिलांना १५०० रुपये दिले जातात, पण महागाई किती वाढली आहे. १५०० रुपये फक्त १५ दिवसात संपून जातात. घरगुती गॅस सिलेंडरच १००० रुपयांना मिळतो मग १५०० रुपये कसे टिकणार, असा सवाल उपस्थित करत लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) मर्यांदांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच, अशा योजनांना भुलून तुमच्या भावी पिढ्यांचे आयुष्य बरबाद करू नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
10 Jan 2026 10:44 AM (IST)
नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जावयाने आपल्या सासूची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर या फसवणुकीत महिलेच्या लेकीचा आणि नातूचा देखील समावेश होता. तब्बल २० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जय भवानी रोड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.
10 Jan 2026 10:38 AM (IST)
इराण (Iran) सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनक्षोभाचा सामना करत आहे. ७ जानेवारीपासून सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांनी आता हिंसक वळण घेतले असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. राजधानी तेहरानसह इराणच्या २७ प्रांतांमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि ‘टाईम’ मासिकाने उद्धृत केलेल्या दाव्यांनुसार, सरकारच्या दडपशाहीत आतापर्यंत २०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले असून, जगापासून हा हिंसाचार लपवण्याचा प्रयत्न खमेनी सरकार करत आहे.
10 Jan 2026 10:30 AM (IST)
नॅडिन डी क्लार्कने मुंबई इंडियन्सने जिंकलेला सामना हातातून हिसकावला आणि महिला प्रिमीयर लीग 2026 चा आरसीबीने पहिला विजय नावावर नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १५४ धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. पराभवानंतर हरमनप्रीत कौरने एक महत्त्वपूर्ण विधान केले.
10 Jan 2026 10:22 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प व्हेनेझुएलाचे ५० दशलक्ष म्हणजेच ५ कोटी बॅरल तेल जागतिक बाजारपेठेत विकणार आहे. त्यांच्या या घोषणेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या हेतू व्हेनेझुएलाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी, तसेच अमेरिकेच्या कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जागतिक तेल आणि उर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. याचा जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होईल यावर सध्या चर्चा सुरु आहे. याच वेळी अमेरिका भारतालाही व्हेनेझुएलाची तेल खरेदी करण्याची संधी देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
10 Jan 2026 10:16 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या एकापेक्षा एक जबरदस्त इव्हेंट सुरू आहेत. या सर्व इव्हेंटमध्ये प्लेयर्सना एक्सक्लूसिव वेपन स्किन, बॅकपॅक, इमोट आणि लूट क्रेट सारखे गेमिंग आयटम्स अत्यंत कमी किमतीत अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्स यूनिवर्सल टोकन देखील क्लेम करू शकणार आहेत. या टोकनच्या मदतीने देखील रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. आता आम्ही तुम्हाला गेममध्ये सुरू असणाऱ्या टॉप इव्हेंटबद्दल सांगणार आहोत. या इव्हेंटमध्ये प्लेअर्स वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.
10 Jan 2026 10:10 AM (IST)
अकोला शहरात आज काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तर यावेळी जोरदार हल्लाबोल करत इम्रान प्रतापगढी यांनी मतदारांना एकजुटीचे आवाहन केले.
“तुमची एकजूट झाली, तर अकोल्याचा महापौर काँग्रेसचाच असेल,” असा ठाम दावा त्यांनी केला. तर अकोटच्या घटनेचा उल्लेख करत “पतंगाचा दोर कुणाच्या हाती आहे, हे अकोटने दाखवून दिलं,” अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. एमआयएमवर टीका करताना त्यांनी “एमआयएमच्या माध्यमातून आमदार साजिद खान पठाण यांना धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप केला आणि “एमआयएमने बिहारमध्ये भाजपचे सरकार बनवण्यास मदत केली,” असा दावाही केला आहे. याशिवाय देशातील परिस्थितीवर भाष्य करताना “2014 नंतर देशाचे हाल होत आहेत,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली. अखेरीस “कहा सोया है चौकीदार” या नज्मेने त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
10 Jan 2026 10:07 AM (IST)
विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेने ग्रामीण भारताला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या VB-G RAM G विधेयकावर भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी नियुक्त झालेल्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांचा सत्कार करण्यात आला. या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार, उपजीविका आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
10 Jan 2026 09:59 AM (IST)
एक्स प्लॅटफॉर्मवर अलीकडेच एक ट्रेंड सुरु झाला होता. यामध्ये ग्रोक एआय लोकांना ईमेज एडीट करून अनड्रेस करून देत होता. हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर भारत आणि ब्रिटनसह अनेक देशांमधील सरकारने कंपनीला नोटिस पाठवले. याबाबत कठोर कारवाई करत योग्य निर्णय घेण्यास सांगितलं. याबाबत आता एक्सने निर्णय घेतला असून या परिणाम यूजर्सवर होणार आहे. अनेक देशांच्या सरकारने पाठवलेली नोटीस आणि सर्वत्र झालेल्या टिकेनंतर आता कंपनीने ग्रोकवरील ईमेज एडीटींग सेवा केवळ पेड यूजर्ससाठी उपलब्ध केली आहे.
10 Jan 2026 09:50 AM (IST)






