नाशिक : चार त पाच महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे बंडाळी गटानं मोठे बंड करत आधी सुरत, नंतर गुवाहटी व्हाया गोवा असा प्रवास करत शेवटी मुंबईत येत भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर ठाकरे गटातील आमदारसह खासदार, नगरसेवक, काही पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ही गळती थांबविण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असताना, आता आणखी एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये एकेकाळी मोर्चे व आंदोलनात शिवसेनेचा बुलंद आवाज असलेले शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आता शिंदे गटाला जवळ केले आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, त्य़ामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
[read_also content=”मोठी बातमी! राज्यात हिंदुजा समूह करणार 35 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या https://www.navarashtra.com/maharashtra/hinduja-group-will-invest-thirty-five-thousand-crores-in-the-state-353771.html”]
दरम्यान, आज मुख्यमंत्री राज्यातील विविध भागात दौरा करत आहेत, आज कोकण, नाशिक, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री विविध कामाचं उद्घाटन करणार आहेत. नाशिकमधील 11 माजी नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सकाळी आठ वाजता हे सर्व ठाकरे गटातील नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यावेळी मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करुन त्यांना शिंदे गटात प्रवेश देणार आहेत.
यापूर्वी जेव्हापासून शिंदे गट शिवसेनेतून फुटला आहे, त्यानंतर खासदार, नवी मुंबई, कल्याण-डोबिंवली, भायंदर, ठाणे आदी शहरातील नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यानंतर आता नाशिकमध्ये आज सकाळी आठ वाजता 11 माजी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून, ठाकरे गटातील गळती काही थांबायचे नाव घेत नाहीय, त्यामुळं ठाकरे गटातील गळती कशी थांबावायची हा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे.