कोल्हापूर : राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे (Illegel Construction) मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रतापगडावरील (Pratap Gad) अफझलखानाच्या कबरीसमोरील (Afzal Khan Tomb) बांधकाम कडक सुरक्षा व्यवस्थेत निष्कासीत करण्यात आले होते. आता कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील (Vishal Gad) बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड किल्ला मोकळा श्वास घेणार आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी इशारा दिल्यानंतर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा पडला आहे.
अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार आहे. वनविभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे १५ दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत; अन्यथा कारवाई करू, अशी सूचना उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केली आहे. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत २० हून अधिक अतिक्रमणे आहेत. गडावर शासकीय जागेत आणि पायथा परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विशाळगड ग्रामस्थांनीही अतिक्रमण केल्याबाबतची कबुली देत अतिक्रमण काढण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे. सोमवारी मंत्रालयात अतिक्रमण काढण्यासंदर्भाची चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार कृती आराखडा केला जाणार आहे.