अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? (photo Credit- X)
पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या बारामती विमानतळाचा वापर प्रामुख्याने पायलट प्रशिक्षणासाठी केला जातो. हे विमानतळ ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ (MIDC) च्या अखत्यारीत येते आणि त्याचे व्यवस्थापन ‘बारामती विमानतळ लिमिटेड’ (BAL) करते. २००९ मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला विकासासाठी हे विमानतळ दिले होते, परंतु विकास न झाल्याने २०२५ मध्ये एमआयडीसीने ते पुन्हा ताब्यात घेतले.
बारामती विमानतळावर पूर्णवेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नाही. डीजीसीएच्या नियमानुसार, येथील एटीसी सपोर्ट फ्लाइंग स्कूलमधील विद्यार्थी किंवा प्रशिक्षक पुरवतात. अपघाताच्या दिवशीही कार्व्हर एव्हिएशनचे प्रशिक्षक एटीसीचे काम पाहत होते. कोणत्याही व्यावसायिक एटीसी तज्ज्ञाशिवाय व्हीव्हीआयपी लँडिंग होणे हा मोठा धोका मानला जातो.
अपघाताच्या वेळी दृश्यमानता केवळ ३ किलोमीटर होती, तर सुरक्षित उड्डाणासाठी ती ५ किलोमीटर असणे आवश्यक आहे. दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने पहिले लँडिंग रद्द केले आणि विमान पुन्हा हवेत घेण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी दुर्घटना घडली.
निवृत्त पायलट एहसान खालिद यांच्या मते, बारामतीची धावपट्टी ७,७१० फूट लांब आहे, जी पुरेशी आहे. मात्र, तिथे ILS (Instrument Landing System) नाही. जर आयएलएस यंत्रणा असती, तर कमी दृश्यमानतेतही वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळाले असते आणि हा अपघात टाळता आला असता.
भारतातील विमानतळे चार श्रेणीत विभागलेली आहेत:
श्रेणी ‘अ’ (बारामती): कोणतीही हवाई वाहतूक नियंत्रण सेवा नसलेले अनियंत्रित विमानतळ.
श्रेणी ‘ड’ (मुंबई-दिल्ली): रडार-आधारित पूर्णपणे नियंत्रित विमानतळ. दुर्दैवाने, बारामती हे श्रेणी ‘अ’ मध्ये येते, जिथे पायाभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहे.
बुधवारच्या विमान अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने विमानतळावर एक समर्पित पथक तैनात केले, जे घटनास्थळी सुरक्षित हवाई ऑपरेशन्सना समर्थन देण्यासाठी आवश्यक हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) आणि हवामानशास्त्रीय सेवा प्रदान करत होते. हवाई दलाच्या मते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून त्यांनी हवाई योद्ध्यांची एक समर्पित पथक तैनात केले.






