photo Credit- Social Media निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील पराभव स्वीकारला
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार संपण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे परदेश दौऱ्यावर गेले आहेत, त्यावरून भाजपने पराभव स्वीकारल्याचे दिसून येते, अशी खोचक टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेदेखील काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. याच वेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
रेवंथ रेड्डी म्हणाले की, ‘महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी देश सोडून परदेशात गेले. यावरून भाजप आणि मोदीजींनी पराभव स्वीकारल्याचे दिसून येते. पण जेव्हा मी वर्तमानपत्रात भाजपच्या जाहिराती पाहिल्या तेव्हा मला असं वाटलं की निवडणूक जिंकण्यासाठी ते देशही तोडू शकतात. पण गेल्या 11 वर्षांत तुम्ही काय केलं, असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला उपस्थित केला.
Vinod Tawade News: काँग्रेस काळातच अदानींंचा विकास झाला; विनोद तावडेंचा राहुल गांधींवर पलटवार
रेवंथ रेड्डी म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 2020 पर्यंत देशातील प्रत्येक गरीबाला घर दिले जाईल, असेही सांगण्यात आले. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे विसराच. पण त्यांनी तीन काळे कृषी कायदे आणले, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीभोवती आंदोलन करावे लागले. यात700 हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. पंतप्रधान मोदींना बिले मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी मागावी लागली.
रेड्डी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री या नात्याने मी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांना आव्हान देऊ इच्छितो की, तुमच्यात हिंमत असेल तर एका केंद्रीय मंत्र्यासह केंद्रीय समिती बनवा आणि ती तेलंगणात पाठवा. तुमच्याकडे पैसे नसतील तर मी दिल्ली किंवा मुंबईला फ्लाइट पाठवीन, पण तुम्ही या आणि गॅरंटी पूर्ण झाली की नाही ते तपासा. आम्ही सरकार स्थापन केल्याच्या 25 दिवसांत 23 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे, एकूण 18,000 कोटी रुपयांचे शेती कर्ज माफ केले. ‘गेल्या 10 महिन्यांत आम्ही तेलंगणात 50,000 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्ही समिती पाठवा. ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत ते मी गोळा करीन आणि तुम्ही मोजू शकता. जर 50,000 पेक्षा कमी एक व्यक्ती असेल तर मी माफी मागतो.
चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!