Uttarakhand Landslide: उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील हवालबाग विकासखंडातील उडयूडा ग्रामपंचायतीत पावसानंतर झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. डोंगरावरून आलेला मोठा मलबा थेट घरात घुसल्याने आई आणि तिची दोन मुले…
भारतीय हवामान विभागाने रविवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसह २६ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे.
सिरमौरला सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. लाहौल-स्पितीमध्ये सोळा, सोलनमध्ये चार, मंडीमध्ये दोन, तर कांग्रा आणि कुल्लूमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली.
शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी…
पुणे शहर आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पुण्यात पावसाचा वेग काहीसा…
Maharashtra Weather : नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात…
देशभरातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये भूस्खलन झाल्याने रस्ते आणि मार्ग बंद झाले आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये डोंगराचा मलबा तीन घरांवर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला…
राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय…
यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली.
Mahabaleshwar Heavy Rain: महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावत अवघ्या ४० ते ४५ दिवसांत तब्बल ५०६९ मिमी (सुमारे २०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून…
मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात काही गाड्या देखील पाण्यात अडकल्या असल्याचे समोर आले आहे.
Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट…
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत पुण्याने सरासरी मासिक पावसाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे शहरात वारंवार मुसळधार पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याने २८ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (अतिवृष्टीचा) 'ऑरेंज अलर्ट' इशारा जारी केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८.१ मिमी पावसाची नोंद झाली.
उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागावर आणि दक्षिण झारखंड व छत्तीसगडच्या लगतच्या भागांवर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत १८ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे.