पुणे – कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात (Kurkumbh MIDC)असलेल्या प्लॉट क्रमांक डी- १८ शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड (Shogun Organics Ltd) या केमिकल कंपनीमध्ये (Chemical Company) रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे स्फोट (Blast) झाला. ही घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली. स्फोटात कंपनीला लावण्यात आलेल्या पत्र्याचेसुद्धा तुकडे झाले आणि पुणे–सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) उडाले. यामध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रकिया करण्याचे काम केले जाते. पण ही प्रक्रिया सुरु असताना रिअॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा मोठा स्फोट झाला. सुदैवाने त्या ठिकाणी अधिक कामगार उपस्थित नव्हते आणि यामध्ये जीवितहानी सुद्धा झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
स्फोटात प्रत्यक्षदर्शी असलेल्या उपेंद्र सिसोदिया, हरिकिशन यांसह आणखी एक हे जखमी झाले आहेत. रिअॅक्टरमध्ये नेमका दबाव निर्माण होण्याचे कारण अजून समोर आलेले नाही. कुरकुंभ औद्योगिक वसाहत भागात केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे त्या भागात अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशा घटनांमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






