Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा

ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2025 | 06:51 PM
"ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा...", शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा (फोटो सौजन्य-X)

"ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा...", शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

  • ऊसाला साडेतीन हजार रुपये एकरकमी दर
  • साखर कार्यालयात मुक्काम अंदोलन करण्याचा इशारा
  •  कर्नाटक राज्यात ऊसाला जर ४३०० रुपये टन दर
नेवासे : ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊनही अजून बरयाच साखर कारखान्यांनी दर जाहीर केला नाही. ऊसाला साडेतीन हजार रुपये एकरकमी दर द्यावा, मागील वर्षाचे २०० रुपये प्रती टन दयावेत आणि ऊसबीलातून कर्वसुली करु नये अशी मागणी केली. ऊसाला साडेतीन हजाराचा दर दिला नाही तर (ता. १७) नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयात मुक्काम अंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयावर अनेक आरोप करत प्रश्नाचा भडीमार केला. अधिकारी मात्र बहुतांश प्रश्नावर निरुत्तर झाले होते.

अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गाळप हंगामाच्या पाश्वभूमीवर ऊसदर व अन्‍य प्रश्नाबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या पुढाकाराने बैठक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अधिकारी, शेतकरी संघटना आणि जिल्हाभरातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, आरले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केले. कर्नाटक राज्यात ऊसाला जर ४३०० रुपये टन दर मिळत असेल तर येथे का दिला नाही. ऊसदर ३५५१ रुपये प्रती टन दर जाहीर न केल्यास आणि मागील २०० रुपये प्रतीटन न दिल्यास ऊसतोड होऊ न देण्याचा इशारा संघटनाचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या रकमेतून कर्जवसुली करु नये अशी मागणी केली. यावेळी कुकडी कारखान्याचे पैसे थकल्याने ते मिळावेत यासाठी बैठकीत शेतकऱ्यांनी मागणी केली.

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित

साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. दर जाहीर कधी करणार, ऊसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरातून कर्जवसुली थांबवणार का? कायद्यानुसार ऊस घातल्यानंतर चौदा दिवसात पैसे देणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून व्याजासह वसुली करणार का अशा अनेक प्रश्नाचा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी भीडामार केला. यातील बहुतांश प्रश्नावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हंगे यांनी प्रश्न समजून घेत तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्याण ऊसदर स्पष्ट न झाल्याने ३५५१ रुपये प्रती टन दर जाहीर न केल्यास ऊसतोड होऊ न देण्याचा इशारा संघटनाचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी दिला. बैठकीला सर्वांना बोलावले जात असताना प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून या बैठकीपासून माध्यम प्रतिनिधींनी दुर ठेवले जाते. याबाबत शेतकरी संघटनचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रश्न उपस्थित केला. बैठक शेतकरी हिताची असते. साखर कारखाने, ऊस दर आणि एकूनच ऊसाबाबत काय चालले आहे याची कल्पना जिल्हाभरातील शेतकऱ्यांना माध्यमातून मिळावी असे आपल्याला वाटत नाही का असे ते म्हणाले.

कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप

ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. अधिकारी लोकांच्या प्रश्नाच्या भडीमाराने निरुत्तर झाले.

चौदा दिवसात पैसे देणे बंधनकारक : शैलेश हिंगे

शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे म्हणणे एकल्यानंत अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे म्हणाले, कारखाने गळीत हंगामाच्या वेळेस उसाला जाहीर केलेला भाव देत नाहीत अशा तक्रारी आहेत. कारखान्याला हा दर देणे परवडत नसल्याचे सांगून कमी दर देत असल्याचे प्रकार घडले आहेत. कारखान्यांनी जाहीर केलेले भाव देणे त्यांना बंधनकारक आहे. वनजकाटे, वाहतुक व अन्य बाबीवर लवकरच बैठक घेतली जाईल. ऊस घातल्यानंतर चौदा दिवसात पैसे देणे कायद्याने बंधनकारक असेल तर कुकडी (श्रीगोंदे ) व नाथ (पैठण) कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले पैसे व्याजासह तातडीने देण्याच्या सूचना हिंगे यांनी दिल्या.

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?

Web Title: Farmer organizations demand to provide a rate of 3500 for sugarcane meeting held at the district collector office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
4

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.