Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel-Karjat Local Train Update: मुंबईकरांसाठी खुशखबर! पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; जाणून घ्या A to Z माहिती

Panvel-Karjat Local Train Update: पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे सप्टेंबर 2026 अखेर 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माहितीनुसार, 29.6 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी रेल्वे मार्गासाठी 2,782 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 11:37 AM
Panvel-Karjat Local Train Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Panvel-Karjat Local Train Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 99% काम पूर्ण
  • 29.6 किमीचा दुहेरी मार्ग
  • सिग्नल यंत्रणा अंतिम टप्प्यात
  • डिसेंबर 2026 चे लक्ष्य
मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी एक भारी बातमी आहे. ज्या पनवेल-कर्जत नवीन लोकल मार्गाची सगळे वाट बघत होते, त्याचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2026 अखेर या प्रोजेक्टचे 99 टक्के काम संपले आहे. आता फक्त शेवटचा हात फिरवणे बाकी आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत हा मार्ग सुरू होणार आहे. Panvel-Karjat Local Train Update:

हा मार्ग एकूण 29.6 किलोमीटरचा आहे आणि डबल लाईनचा आहे. यासाठी सरकारने 2782 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा मार्ग सुरू झाला की पनवेल ते कर्जत हा प्रवास खूप सोपा होणार आहे. नवी मुंबई आणि रायगडचा संपर्क एकदम मजबूत होणार आहे.मोठी कामे सगळी संपलीया प्रोजेक्टमध्ये सगळ्यात मोठी कामे म्हणजे पूल आणि बोगदे. ती सगळी कामे आता पूर्ण झाली आहेत.

या मार्गावर 9 मोठे पूल, 35 छोटे पूल, 5 रेल्वे उड्डाणपूल आणि 16 अंडर ब्रिज बांधायचे होते, ते सगळे बांधून झाले आहेत. पनवेल आणि कर्जतला दोन मोठे फ्लायओव्हर पण तयार झाले आहेत.या मार्गावर तीन बोगदे आहेत. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आतमध्ये ट्रॅक टाकण्याचे काम पण झाले आहे. आता फक्त बोगद्यामध्ये लाईट आणि इतर इलेक्ट्रिकची कामे चालू आहेत.

रूळ जोडण्याचे काम जवळपास संपले

रूळ टाकण्याचे काम पण आता शेवटच्या टप्प्यात आहे. एकूण 69.70 किलोमीटरपैकी 68.70 किलोमीटर रूळ जोडून झाले आहेत. खडी टाकणे आणि रूळ फिट करणे पण झाले आहे. पुणे एक्सप्रेस वे च्या खालून जाणाऱ्या पुलातून पण रूळ जोडले गेले आहेत. पनवेल, चौक आणि मोहपे या ठिकाणी पॉइंट आणि ट्रॅक बदलण्याचे अवघड काम पण यशस्वी झाले आहे.

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

स्टेशन कशी असणार?

प्रवाशांसाठी स्टेशनची कामे पण जोरात चालू आहेत. नवीन पनवेलचे स्टेशन तर सुरू पण झाले आहे. चिखले आणि मोहपे येथील स्टेशनच्या इमारती पूर्ण तयार आहेत. चौक येथे स्टेशनची बिल्डिंग आणि भुयारी मार्ग तयार झाला आहे. तिथे आता शेड आणि आजूबाजूचे काम चालू आहे. कर्जतला प्लॅटफॉर्म, लिफ्ट, सरकते जिने, जिने यांची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. म्हणजे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

सिग्नलचे काम 95 टक्के झाले

ट्रेन सुरू करण्यासाठी सिग्नल खूप महत्वाचे असते. त्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मोहपे आणि चौक स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची टेस्टिंग पण झाली आहे. फॅक्टरी टेस्ट आणि साईट टेस्ट दोन्ही पास झाल्या आहेत. दूरसंचार म्हणजे टेलिकॉमची कामे पण चालू आहेत.

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

जमिनीचा प्रश्न संपला

बऱ्याचदा प्रोजेक्ट जमिनीमुळे अडकतात, पण इथे तसे झाले नाही. लागणारी सगळी खाजगी आणि सरकारी जमीन घेतली आहे. वनविभागाची जमीन पण मिळाली आहे. तिथे काम पण पूर्ण झाले आहे. सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत.या मार्गाचा फायदा काय?हा मार्ग सुरू झाला की मुंबईच्या लोकल नेटवर्कला एक नवा पर्याय मिळेल.

कर्जतला जायला आता दुसरा मार्ग मिळेल. गर्दी कमी होईल आणि वेळ पण वाचेल. नवी मुंबई, पनवेल, रायगड या भागात घरांचे भाव वाढतील, नवीन नोकऱ्या येतील आणि विकास जोरात होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की डिसेंबर 2026 हे टार्गेट आहे आणि त्याच वेळेत ट्रेन धावेल. म्हणजे नवीन वर्षात पनवेल-कर्जत लोकलचा प्रवास आपण करू शकणार आहोत.

Web Title: Panvel karjat local train corridor 99 percent complete december 2026 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Local Trains
  • Maharshtra news
  • Mumbai Train
  • panvel

संबंधित बातम्या

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा
1

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
2

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!
3

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
4

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.