Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; मशागत पूर्ण, पण पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाची मशागत पूर्ण झाली असली तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतेत असून पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 16, 2026 | 09:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला असून, काळ्या आईची ओटी भरण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे रखडली होती. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आणि इतर पूर्वतयारीची कामे पूर्ण केली. आता मात्र पावसाअभावी ही सर्व तयारी निष्फळ ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम ट्रॅक्टर सेवांच्या दरांवरही झाला आहे. नांगरणी, रोटाव्हेटर, वखरणी आणि पेरणीसाठी ट्रॅक्टरचे भाडे वाढल्याने शेतीचा खर्च आणखी वाढला आहे. आधीच खत, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमतींमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

दरम्यान, शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे पशुधनाचा वापर कमी झाला असून ग्रामीण भागात मजुरांची कमतरताही प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक मजूर बांधकाम क्षेत्र किंवा मोठ्या शहरांकडे वळल्याने शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे कठीण बनले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर आणि यांत्रिक साधनांवरच अवलंबून राहू लागले आहेत.

Tukaram Mundhe : ‘तुकाराम मुंढेंचं एक बाटली रक्त सर्व खातेप्रमुखांना द्या’; माजी मंत्र्याची हटके मागणी

सध्या बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असून, वेळेत पाऊस झाल्यास पेरणीला वेग मिळेल आणि खरीप हंगाम सुरळीत पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाचा विलंब कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

Web Title: Farmers await rain land preparation is complete but sowing has been delayed causing growing anxiety among them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
1

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
2

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी
3

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.