Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: महावितरण विरोधात वाईत शेतकरी आक्रमक: सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पेच

पंप कनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषतः वाई, सातारा आणि कराड तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2025 | 06:15 PM
Farmers oppose solar agricultural pump scheme by shutting down traditional electricity connections

Farmers oppose solar agricultural pump scheme by shutting down traditional electricity connections

Follow Us
Follow Us:

Satara News: वाई : महावितरण कंपनीच्या नवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाई तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी थेट सोलर पॅनेलची प्रतिकृती घेऊन आंदोलन केले. पारंपरिक वीज कनेक्शन बंद करून थेट सौर ऊर्जेवर चालणारे ७.५ एच.पी. क्षमतेचे पंप कनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषतः वाई, सातारा आणि कराड तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपांसाठी नवीन वीज कनेक्शन देणे पूर्णपणे थांबवले आहे. याला पर्याय म्हणून शासनाने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा असला तरी, या धोरणाने अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण केल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः सातारा जिल्ह्यात, शेतकरी नदी किंवा कॅनॉलमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून परवाना घेतात. पूर्वी या परवान्याच्या आधारावर पोलवर मीटर बसवून वीज कनेक्शन मिळत असे.शासनाने केवळ ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे.नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या परवानाधारक शेतकऱ्यांसाठी नवीन वीज कनेक्शन कसे देण्यात येणार, याबद्दल कोणतीही ठोस पॉलिसी महावितरणने अद्याप जाहीर केलेली नाही.

शेतकऱ्यांनी सोलर पॅनेलची प्रतिकृती घेऊन आंदोलन करत,शासनाचे लक्ष वेधले. नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रणाली व्यावहारिक नाही. त्यांना पारंपरिक वीज कनेक्शनचीच आवश्यकता आहे.यावेळी उपस्थित असलेल्या विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य श्री. स्वप्निल भाई गायकवाड यांनी या धोरणातील त्रुटींवर बोट ठेवत, महावितरणने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली. संतोष तात्या गायकवाड, रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, अमित चव्हाण, उमेश मोरे, किरण बागडे, सिद्धार्थ कांबळे आणि शंकर भणगे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

महावितरणचे हे धोरण भूजल पातळीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असले तरी, नदी आणि कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ते अन्यायकारक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाचा पाणी उपसा परवाना आहे, त्यांना ७.५ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी पारंपरिक वीज कनेक्शन देण्याचा पर्याय तातडीने सुरू करावा.सौर पंप प्रणाली ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही (उदा. नदीपात्र, उंच हेड), अशा ठिकाणी पारंपरिक वीज कनेक्शनला प्राधान्य देणारी लवचिक पॉलिसी महावितरणने जाहीर करावी. मोठ्या शेतीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या १० एच.पी. किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या सौर पंपांचा पर्याय योजनेत समाविष्ट करावा.जोपर्यंत महावितरण यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा आणि कराड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा असंतोष कायम राहील. शासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तर आम्ही स्वस्थ बसणार नाही

“जब तक न होगा समाधान, तब तक जारी रहेगा यह संग्राम।”.या भागातील समस्या वेगळ्या आहेत,डोळ्यासमोर पाणी असून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा
स्वप्नील गायकवाड यांनी घेतला आहे.

Web Title: Farmers oppose solar agricultural pump scheme by shutting down traditional electricity connections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • maharashtra farmers
  • Satara News
  • solar energy

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.