गोंदिया : आषाढीनंतर श्रावण, भाद्रपद, गणेशोत्सव, नवराष्ट्र उत्सव ते दिवाळीपर्यंत धार्मिक सण-उत्सव सुरू होतात. रविवारी आषाढी एकादशी असल्याने उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या वाढत्या महागाईत (Rising inflation) उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने ( increased by five to ten per cent ) वाढ झाली आहे. त्यामुळे, सामान्य नागरिकांसाठी उपवास करणेही आता अवाक्याबाहेरचे झाले आहे.
महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे, सामान्य नागरिक उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवास धरून आषाढी एकादशी साजरी करण्यावर भर देत आहेत. यापूर्वीच्या तुलनेत उपवासाच्या साहित्याचे दर सात ते आठ रुपयांनी वाढल्याने उपवास करणे, सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे. तरीही देवाविषयी श्रद्धा असल्याने उपवास करणारच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भगर आणि शेंगदाणा हे उपवासाला लागणारे नियमित वस्तू आहेत. सध्या शेंगदाण्याचे दर आठ ते दहा टक्क्याने वाढले आहेत. दिवाळीपर्यंत धार्मिक सण उत्सव असतात. त्यामुळे हे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भगर : १०५ ते ११५
साबुदाणा : ५० ते ५४
शेंगदाणे : ११० ते १२०