नाशिक (Nashik) येथून एक मोठी बातमी (News) समोर येत आहे. सिन्नर शिर्डी (Shirdi) महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra | 10 people died and several others injured after a bus carrying Sai Baba devotees collided with a truck near Pathare on Nashik-Shirdi Highway: Nashik Police pic.twitter.com/Xel2Irb0vc
— ANI (@ANI) January 13, 2023
मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.
मृतांची नावे
1.दीक्षा गोंधळी, वय 17
2. प्रतीक्षा गोंधळी, वय 45
3. श्रावणी भारस्कर, वय 35
4. श्रद्धा भारस्कर, वय 9
5. नरेश उबाळे, वय 38
6. वैशाली नरेश उबाळे, वय 32
7. चांदनी गच्छे
8. बालाजी कृष्ण महंती, वय 28
9. अंशुमन बाबू महंती, वय 7
10. रोशनी राजेश वाडेकर, वय 36
जखमींंची नावे – निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर, शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल, योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर..