रिसोड : पोटच्या मुलीचा विनयभंग (Girls molestation) केल्यामुळे येथील इंदिरानगरमध्ये (Indiranagar) राहणाऱ्या नराधम पित्याला (Naradham father) तीन वर्षे सश्रम कारावास (Three years rigorous imprisonment) व तीन हजार रुपये दंडाची (Fine of three thousand rupees) शिक्षा वाशीम येथील विशेष न्यायालयाने सुनावली (special court ruled). हा निकाल ५ जुलै रोजी दिला. रिसोड येथील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या अठरा वर्षीय मुलीने वडिलांच्या विरोधात १८ जून २०२१ रोजी तक्रार दिली होती की, वडील शेख अख्तर शेख अकबर याला सामान आणण्यासाठी पैसे मागितले असता त्याने जवळ ओढले व विनयभंग केला.
मुलीने २४ जून २०२१ रोजी वडिलांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. ५ जुलै रोजी विशेष न्यायालय वाशीम यांनी आरोपी शेख अख्तर शेख अकबर (४५) (रा.इंदिरानगर) यास दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच एक वर्षे सश्रम करावास व पाचशे रुपये दंड अशी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दंड ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरगुडे यांच्याकडे होता. तर, सरकारी वकील म्हणून अभिजीत व्यवहारे यांनी काम पाहिले.