Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण

आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून अवघ्या 100 ते 150 फूट अंतरावर बिबट्या दिसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये खळबळ उडाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2025 | 03:01 PM
शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण

शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण

Follow Us
Follow Us:
  • शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या
  • शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
  • पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण
न्हावरे : आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सकाळचा परिपाठ सुरू असतानाच गुरुवारी (दि. 20) शाळेपासून अवघ्या 100 ते 150 फूट अंतरावर बिबट्या दिसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये खळबळ उडाली. शिक्षिका रेखा लंघे यांनी शेतामध्ये बिबट्या हालचाल करत असल्याचे पाहताच प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गात बसविले.

घटनेची माहिती शिक्षिका लंघे यांनी मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांना दिली. त्यांनी तत्काळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे यांना कळवले. बेंद्रे यांनी वनविभागाला माहिती देताच विभागाच्या पथकाने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण कायम

गेल्या काही महिन्यांपासून आंबळे परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असून, बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आहे. यामुळे नागरिक, महिला, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण कायम आहे. तरीही वनविभागाने योग्य ती प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात

वनविभागाकडे शिरूरच्या पूर्व भागात तब्बल 200 ते 300 बिबटे असल्याची माहिती चर्चेत असली, तरी अधिकृतरीत्या विभागाने यास दुजोरा दिलेला नाही. मात्र,बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे चित्र वारंवार येणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील

वनविभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा तसेच बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “वेळीच उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील,” असा इशारा सरपंच सोमनाथ बेद्रे व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अण्णा बेंद्रे यांनी दिला आहे.

Web Title: Fears have increased after a leopard was spotted just a hundred feet from the school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Leopard
  • School news

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार
2

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
4

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.