Mohit Kamboj Car Attack : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आता अॅक्शन मोडवर आली आहे. या प्रकरणी आता मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीनं गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
एकीकडे हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना या वाद रंगला असतानाच, काल (शुक्रवारी) भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली.
मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीनं गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या घटनेतील सत्य समोर येऊ शकतं, असंही मोहित कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात यावा, असंही कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे.
राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद शिगेला पोहोचला असतानाच, काल भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मातोश्री बंगल्याबाहेरून मोहित कंबोज यांची गाडी जात असताना शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. दरम्यान या घटनेसंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. कंबोज यांच्या घरावर झालेला हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार होता असा आरोप भाजप नेत्यांनी केला असून, हल्ल्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तर मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय.
राणा दाम्पत्य आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याविरोधात शिवसैनिक मातोश्रीबाहेर पहारा देत होते. एवढ्यात भाजप नेते मोहित कंबोज यांची कार मातोश्रीबाहेरुन जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. शिवाय मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे सर्व आरोप खोडून काढले. तर हल्ल्यानंतर भाजप नेते कंबोज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.