प्रकाश आंबेडकर यांना हायकोर्टाचा धक्का (फोटो -सोशल मीडिया/ani)
मुंबई: मागील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले. तर महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला. मात्र या निकालानंतर महाविकास आघाडी आणि अन्य विरोधी पक्षांनी मतदानाची आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. तर ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदारांचा वाढलेला आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका ऐकून कालचा आमचा कामकाजाचा वेळ वाया गेला, असे निरीक्षण हायकोर्टाने याचिका फेटाळताना नोंदवले आहे.