औरंगाबाद: औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक मोठी दुर्घटना घडली आहे. जोगेश्वरी परिसरातील वाळूज एमआयडीसीतील (MIDC) एका प्लास्टीकच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. (Aurangabad Fire News) आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
[read_also content=”वाशिममध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोसोबत डान्स; ८ जणांवर गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/dance-with-photo-of-aurangzeb-and-tipu-sultan-in-washim-a-case-has-been-registered-against-8-persons-nrdm-362055.html”]
भीषण आगीमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. अग्निशमन वाहनांसह या ठिकाणी पाण्याचे टँकरदेखील आणण्यात आले आहेत. कंपनीच्या चारही बाजूंनी सोसायटी असून एका घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. कंपनीत काही कामगार देखील कामाला होते अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे.
याआधी काल औरंगाबाद येथील शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग लागली होती.औरंगाबाद येथील शहागंज परिसरात कपडा मार्केट हा गजबजलेला परिसर आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज पुन्हा एमआयडीसीतील प्लास्टीक कंपनीला आग लागली आहे. आगीचे हे सत्र वाढत असल्याचे दिसत आहे.