Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर शहर आणि तालुक्यावरती पुराचे संकट; शहरासह ४२ गावांना सतर्कतेचा इशारा

नदीला मिळणार्‍या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2022 | 01:07 PM
पंढरपूर शहर आणि तालुक्यावरती पुराचे संकट; शहरासह ४२ गावांना सतर्कतेचा इशारा
Follow Us
Follow Us:

पंढरपूर : उजनी धरण व वीर धरण परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून दुपारी ४:३० वाजता धरणातून ९१ हजार ६०० क्युसेकचा तर वीर धरणातून ४३ हजार ३७७ क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. तर नदीला मिळणार्‍या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणशोत्सवापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु होता. मात्र गणपती विसर्जनानंतर पाऊस कमी झाल्याने विसर्गातही घट करण्यात आली होती. तर मागील दोन दिवसापासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक १६ रोजी दुपारी ४ वाजता उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ९१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर वीर धरणातून ४३ हजार ३७७ क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग शनिवारी पहाटेपर्यंत पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दगडी पूल, ६ बंधारे पाण्याखाली जाणार आहेत, तर पुंडलिक मंदिरांसह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने मंदिरे पाण्यात अर्धी बुडली जाणार आहेत. सद्या देखील नदी पात्रात पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत चंद्रभागा पात्रातील दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडीपूळूज हे ६ बंधारे पाण्याखाली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उजनी धरणातून पुन्हा मोठा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. चंद्रभागा नदी काठच्या भागातील शेतीला पाण्याचा फटका बसणार आहे. तर नदीकाठच्या ओढ्यांमधून देखील पाणी मागे सरकणार असल्याने अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पंढरपूर ते जुना अकलूज रोडवर शिरढोण येथील ओढ्यावरील पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद होणार आहे. तर पुरस्थिती उदभवली की या भागातील विद्युत पुरवठा बंद करावा लागत आहे.

भीमा नदीपात्रात १ लाख १५ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (४४३.६०० पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणार्‍या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. १ लाख ३८ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (४४३. ६०० पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( ४४५.५०० पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर १ लाख ९७ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( ४४६.३०० पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

[read_also content=”देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/to-strengthen-the-economy-of-the-country-the-youth-should-increase-their-participation-devendra-fadnavis-appeal-nrdm-327095.html”]

भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधार्‍यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ४२ गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.

Web Title: Flood crisis in pandharpur city and taluk alert alert for 42 villages including city nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2022 | 01:07 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Ujni

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.