कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) ग्रामीण भागातील (Rural Area) भाल, नेवाळी, द्वारली भागातील लोकसंख्या वेगाने वाढत असताना (Population Grows Rapidly) या भागात रस्ते (Roads), पिण्याच्या पाण्यासह (Drinking Water) दिवाबत्ती (Street Lights) आणि स्मशान भूमीची (Crematorium) समस्या भेडसावत आहे. २०१८ पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असताना महापालिका प्रशासनाकडून या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या महिला जिल्हाध्यक्षा शालिनी भोंडगे यांनी केडीएमसी मुख्यालयानजीक कार्यकर्त्यासह आमरण उपोषण सुरु केले आहे.
जोपर्यत समस्या सुटणार नाहीत तोपर्यत हे उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांनी सांगितले. तर या उपोषणाला रिपाइंच्या प्रदेश अध्यक्षा सुनिता चव्हाण यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, शालिनी भोंडगे, योगेश गायकवाड, सनी लोंढे, डॉ. विशाल निकाळजे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
[read_also content=”OPPO Reno 10 सीरीज लाँच! https://www.navarashtra.com/web-stories/oppo-reno-10-series-launch-today-see-the-full-specifications-nrvb/”]
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनेक वर्षापासून भालगाव, नेवाळी, वसार, द्वारलीपाडा, द्वारली, आडवली, ढोकळी, नांदिवली गावासाठी स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन टाकून कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी. या गावांमध्ये बाहेरुन आलेले अनेक नागरिक कायमस्वरुपी स्थायिक झाले असून ज्यावेळी बाहेरील आलेल्या नागरिकांचे घरातील एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास येथील स्थानिक भूमीपुत्र विरोध करतात.
ज्यामुळे या नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठया समस्येला तोंड द्यावे लागते. नाईलाजास्तव ते मयत कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील स्मशानभूमीमध्ये सर्वसाधारण ८ किलोमीटर अंतर चालत यावे लागते. हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याकरिता या गावांच्या मध्यभागी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वतंत्र मोठी स्मशानभूमी बांधून येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावून मरणानंतर होणाऱ्या यातनेपासून मुक्ती द्यावी.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील भालगांव, नेवाळी, वसार, द्वारलीपाडा, द्वारली, आडवली, ढोकळी, नांदिवली आदी गावांमध्ये मोठया प्रमाणात चाळी तर निर्माण झाल्या पण नागरिकांच्या सुविधांचं काय ? हा एक मोठा प्रश्न येथील नागरिकांपुढे आहे. या गावांमध्ये कसल्याही प्रकारची दिवाबत्तीची काहीच सोय नाही. ज्यामुळे अंधारामध्ये याठिकाणी अनुचित प्रकार कधीही होऊ शकतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आदी गावांचा सर्व्हे देखील केला आहे मात्र अद्याप पर्यंत या गावांमध्ये दिवाबत्तीची सोय झालेली नाही. दिवाबत्तीची सोय लवकरात लवकर करून द्यावी.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील आंबिवली गाव आनंद नगर येथील तब्बल ४२ कुटूंब आहेत ज्यांच्याकडे स्वतःचा सात बारा असताना हे ४२ कुटूंब कधीही रिंग रोडमध्ये उध्वस्त होवू शकतात. रिंग रोडमध्ये हे ४२ कुटूंब बाधित होण्या अगोदर या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. या मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.