Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा ठाकरेंविरोधात राग! सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाला दोष

ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वालाच दाेष दिला आहे. काॅंग्रेस साेबत गेल्याने लाेकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2025 | 11:51 AM
पुन्हा ठाकरेंविरोधात राग! सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाला दोष

पुन्हा ठाकरेंविरोधात राग! सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाला दोष

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वालाच दाेष दिला आहे. काॅंग्रेस साेबत गेल्याने लाेकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांचे नाव न घेता, त्यांचा ‘सकाळचा भाेंगा’ असा उल्लेख त्यांनी केला. त्याचवेळी या माजी नगरसेवकांच्या विराेधात भाजपमधील इच्छुकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा ओसवाल, संगिता ठाेसर, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे त्यांच्या प्रभागातील भाजपचे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले आहे. यासंदर्भात दै. नवराष्ट्रने वृत्त प्रसिद्ध केले हाेते. या पाच नगरसेवकांनी गुरुवारी आपली भुमिका पत्रकार परीषदेत मांडताना पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वावरच टिका केली, त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना ही खरी आहे, असा दावाही केला. यावेळी भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष राजाभाऊ शेंडगे, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते.

खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहिलो होतो. पण पक्ष नेतृत्वाचे पुण्यात लक्ष नाही. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असून, लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. – विशाल धनवडे, माजी नगरसेवक आम्हाला हिंदुत्वाची चाड असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होते. पण काँग्रेससोबत शिवसेना गेल्याने आपले चुकले आहे हे लक्षात आले. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली, जावळे यांनी माझे भाजपमध्ये माझे कोणाशीही वाद नाहीत, पूर्वी मी पक्षातच होतो, पण तांत्रिक कारणामुळे मी शिवसेनेत गेलो होतो. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या मार्गदर्शन होते. – बाळा ओसवाल, माजी नगरसेवक स्थानिक पदािधकाऱ्यांमध्ये नाराजी

या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानीक भाजप पदाधिकार्‍यांमध्ये तसेच इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हे नगरसेवक ज्या मतदारसंघातील आहेत, तेथील आमदारांनाच मुळात हे प्रवेश खटकल्याचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलू लागले आहेत. मागील दहा वर्षात भाजपचे अनेक कार्यकर्ते तयार झाले असून स्वबळावर एकहाती महापालिकेत सत्ता आणण्याची ताकद निर्माण झाली आहे. असे असताना अगदी काही महिन्यांपू्वी पक्षाचे सर्वोच्च नेत्यांवर शारिरिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍यांना उमेदवारी देण्यास स्थानीक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध असेल, असेही हे कार्यकर्ते सांगू लागले आहेत. आम्हाला पक्षाकडून निष्ठेचे हेच फळ मिळणार? असा सवालही हे कार्यकर्ते करु लागले आहेत. भाजपमध्ये ज्या प्रभागातून हे नगरसेवक आले आहेत, तेथे कार्यकर्त्यांकडून विरोधात थेट बॅनरबाजी सुरू झाली आहे. यामुळे भाजपच्या ताकदीपेक्षा नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यनगरीत सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद! महिला दरवाजा उघडताना चोरटे आले अन्…

हिंदुत्वापासून पक्ष दूर

पुण्यातील शिवसेनेकडे नेत्याचे लक्ष नाही, वर्षानुवर्षे तेच लोक पदांवर आहेत. हिंदुत्वापासून पक्ष दूर गेल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळेल अथवा मिळेल, पण आम्ही काम करू, आम्ही आलो म्हणून भाजपमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. त्यांनाही उमेदवारी मिळू शकते, असे धनवडे यांनी नमूद केले.

Web Title: Former corporators who left the party have expressed anger against uddhav thackeray nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • maharashtra
  • pune news
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन
1

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
2

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त
3

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
4

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.