मुंबई: गेल्या दोन दिवसापासून माजी महापौर किशोरी पेडणेकर (Ex Mayor Kishori Pednekar) पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या असून निर्भया पथकाच्या गाड्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी खोटे बोल पण रेटून बोल.. असे विचित्र वागणे भाजपचे (BJP) असल्याचे सांगत भाजपवर थेट निशाणा साधला.
भाजपने केलेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपामुळे चौकशीला सामोरे पेडणेकर काही दिवस मौन व्रतच जणू धारण केले होते मात्र आता भाजपावर टीकास्त्र सोडून आपण राजकारणात सक्रिय असल्याचे त्यांच्याकडून दाखवण्यात आले असल्याचे दिसत आहे
एसआरए घोटाळा (SRA Scam) केला असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केला होता. तसेच पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गेले दोन महिने पेडणेकर यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही.
एवढेच नाही तर त्या जाहीर कार्यक्रमात कधी दिसूनही आल्या नाही. पण पुन्हा एकदा अज्ञात वाचत असलेल्या पेडणेकर राजकारणात सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत. निर्भय पथकाच्या गाड्या संदर्भात मुद्दा उपस्थित करत या गाड्या कुठे आहेत, असे विचारणार पेडणेकर यांनी केली. गाड्या कुठे उभे असायच्या ती ठिकाणी आम्ही दिली आहेत. आम्ही कोणावर आरोप केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
[read_also content=”देवा रे देवा! हे काय आक्रित, तिने मंदिराआड लपवली दारू, शेवटी पोलिसांना सुगावा लागला आणि… https://www.navarashtra.com/viral/police-found-illicit-liquor-from-temple-drawer-video-goes-viral-on-social-media-in-vardha-maharashtra-nrvb-353368.html”]
मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र विविध कामांचे श्रेय घेण्यासाठी करोडो रुपयांची जाहिरात प्रसिद्ध होत असून त्याचेही ऑडिट व्हायला पाहिजे, असे पेडणेकर यांनी सांगितले. पेडणेकर यांनी पुन्हा भाजप विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात केल्यामुळे येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध पेडणेकर यांचा सामना मुंबईकरांना पाहायला मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे